कुणालाही दया-माया नाही कठोर कारवाई  करणार -पोलीस महासंचालक माथुर 

ठाणे : प्रतिनिधी :
राजकीय कट रचून करण्यात आलेल्या हत्याकांडात कुणालाही दया माया दाखविण्यात येणार नाही. संबंधितावर कडक कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी ठाण्यात व्यक्त केली. ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात वितक्क,परिक्षेत्रिय प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर पोलीस महासंचालक माथुर यांनी प्रशिक्षण केंद्राची पाहणी करीत मुख्यालयातील शस्त्रसाठा याचीही पहाणी केली. त्यांनी ठाणे ग्रामीण पोलिसांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील, ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांचीही उपस्थिती होती. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला थेट उत्तरे दिली. नगर मधील हत्याकांड ही दुर्दैवी घटना असून यात समावेश असलेल्या आरोपींची गय केली जाणार नाही. 2 हजाराच्या जमावावरही पोलिसांनी कारवाई केलेली आहे. सध्या नगरची परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांवर कुठलाही राजकीय दबाव नाही. हत्येत सहभागी असलेल्या मोठ्या आरोपींना अटक केली असून पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी नगरमध्ये आहेत. जनतेचा संपर्क वाढविण्याचे अनेक कर्यक्रम हाती घेतले आहेत. त्यामाध्यामातूनच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे. जेव्हा मोठ्या गुंडांवर कडक कारवाई पोलिसांद्वारे करण्यात येते, तेव्हा जनतेचा पोलिसांवर विश्वास बसतो. कारण आज सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे. फेसबुक, सोशल मिडीयाचा वापर आज मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पोलीस महासंचालक माथुर यांनी सांगितले.

ठाण्यात आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नगर हत्याकांडावर आपली प्रतिक्रिया दिली. नगर मध्ये सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, पण घटना दुर्दैवी आहे. राजकीय कट रचून ही हत्या करण्यात आली आहे. यात कोणालाही दया माया दाखवली जाणार नाही, सर्वांवर कडक कारवाई केली जाईल असे सतीश माथूर म्हणाले. तसेच पोलिसांवर  दबाव नसल्याचेही त्यांनी सांगिलते. माथूर यांनी ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालयात वितक्क परिक्षेत्रीय प्रशिक्षण केंद्राचे आज उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published.