लासलगाव येथे डॉ.सॅम्युअल हनेमन यांची जयंती साजरी

लासलगाव येथे डॉ.सॅम्युअल हनेमन यांची जयंती साजरी

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण
लासलगाव डॉक्टर्स असोसिएशन आणि लोटस मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विध्यमाने  डॉ.सॅम्युअल हनेमन यांची जयंती होमिओपॅथिक दिवस म्हणून लासलगाव येथील भास्कर लीला लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ.सॅम्युअल हनेमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथि चे अध्यक्ष डॉ.भालचंद्र ठाकरे,के बी आब्बड होमिओपॅथि मेडिकल कॉलेज चांदवड चे प्राचार्य डॉ.अजय दहाड,उपप्राचार्य डॉ.सौ.संगिता दोशी,लासलगाव डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.प्रकाश गांगुर्डे,लोटस मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल चे डॉ.खुशाल जाधव,डॉ.सचिन देवडे,डॉ.गौरव काळे,डॉ.राहुल कदम,डॉ.मनोज आहेर,डॉ.साईनाथ ढोमसे,डॉ.महेश ढोमसे,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉ सॅम्युअल हनेमन यांच्या विषयी माहिती देत होमिओपॅथि बद्दल अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले.डॉ ठाकरे यांनी शासन दरबारी शासकीय सेवेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रमास लासलगाव डॉक्टर असोसिएशन चे डॉ.उषा बंदसोडे,डॉ मनीषा पलोड,डॉ स्वाती जैन,डॉ श्रीनिवास दायमा,डॉ विजय बागरेचा,डॉ सुनील जांगडा,डॉ सुजित गुंजाळ डॉ.अरुण काळे,डॉ सुबोध पटणी,डॉ सुरेश दरेकर,डॉ कैलास पाटील,डॉ.अविदत्त निरगुडे,डॉ अनिल बोराडे,डॉ श्रीकांत आवारे,डॉ प्रणव माठा,डॉ अमोल गायकर,डॉ रुपेश ठाकूर,डॉ उमिया फारूक,डॉ किरण निकम,डॉ पौरव गांगुर्डे,डॉ संगीता सुरशे,डॉ संजय पलोड,डॉ लोहाडे,डॉ लाहोटी,डॉ आशोक महाले,डॉ केगे,डॉ स्वप्नील पाटील,डॉ वाकचौरे,डॉ चव्हाण,डॉ मुज्जमिल  मणियार,डॉ चांडक,डॉ सोनवणे डॉ सचिन जांगडा आदी उपस्थित होते.

कार्यकमाचे सूत्र संचालन डॉ विलास  कांगणे व डॉ विकास चांदर यांनी केले तसेच पाहुण्यांचा परिचय डॉ स्वप्नील जैन यांनी करून दिला व आभार प्रदर्शन डॉ अमोल शेजवळ यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published.