गोंदेगाव(ता.निफाड)येथून एक महिला व एक मुलगा बेपत्ता

गोंदेगाव(ता.निफाड)येथून एक महिला व एक मुलगा बेपत्ता

 

 

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण
निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथील एक महिला व एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार लासलगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार गोंदेगाव येथील दत्तात्रय लक्ष्मण सांगळे (वय४९) यांची सून पूनम अशोक सांगळे (वय१९) ही दिनांक ३१-०३-२०१८ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेल्याची तक्रार दत्तात्रय सांगळे यांनी नोंदविली आहे.पूनम सांगळे ही महिला रंगाने सावळी,उंची १६५ सेंमी,शरीराने सडपातळ,चेहरा उभट,अंगात पिवळसर साडी व ब्लाउज,पायात चप्पल,गळ्यात सोन्याचे मणी,पायात जोळवे तसेच जवळ ६००रु.आहेत

त्याच प्रमाणे गोंदेगाव येथील लक्ष्मण नामदेव कांगणे(वय ४८)यांचा मुलगा नितीन लक्ष्मण कांगणे(वय२६) हा दिनांक ३१-०३-२०१८ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून कोणास काहीही न सांगता निघून गेला असल्याची तक्रार लक्ष्मण कांगणे यांनी नोंदवली आहे.नितीन कांगणे हा रंगाने सावळा,उंची १६८ सेंमी,शरीराने मजबूत,चेहरा गोल,अंगात सफेद रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, केस काळे व सोबत २० हजार रु आहेत.
वरील दोन्ही तक्रारींची नोंद अनुक्रमे १६/२०१८ व १७/२०१८ अन्वये लासलगाव पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर मध्ये दाखल करण्यात आली आहे.

वरील सदर महिले बाबत व मुलाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात ०२५५०-२६६०५५ किंवा सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे(७३५०५३५२००) किंवा सहायक पोलिस उप निरीक्षक डी.व्ही.लाड(८८८८२५३५३)
यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन लासलगाव पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.