15 वर्ष उत्तम सेवा बजावणाऱ्या पोलिसांना सन्मानचिन्ह 

15 वर्ष उत्तम सेवा बजावणाऱ्या पोलिसांना सन्मानचिन्ह 

 

ठाणे ( श्याम जांबोलीकर ) : ठाणे पोलीस आयुक्तालयातील अकरा अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.पोलीस सेवत 15 वर्षे उत्तम सेवा बजावल्याबद्दल पोलिसांचा हा गौरव महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी करण्यात येणार आहे.अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

   ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील डोंबिवली-मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन काब्दुले, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कार्ले,वरिष्ठ पोलीस निरिक्षक रविंद्र दौंडकर, पोलीस हवालदार राजेंद्र चासकर,पोलीस हवालदार ठाणे ग्रामीण संजय कदम,पोलीस हवालदार सिध्दार्थ गायकवाड ठाणे शहर, पोलीस हवालदार अंकुश इंगळे, पोलीस हवालदार भरत नवले, पोलीस नाईक सुनिल रोमन, पोलीस नाईक कैलास पाटील आणि पोलीस नाईक संभाजी मोरे अशा 11 अधिकारी कर्मचा-यांना 15 वर्ष उत्तम सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.