उष्माघाताचा निफाड तालुक्यातील दुसरा बळी

उष्माघाताचा निफाड तालुक्यातील दुसरा बळी

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असून बहुतेक भागात तापमानाचा पारा चाळिशीही ओलांडली आहे उन्हाने जिवाची लाही होत असून अनेक भागात उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना निफाड तालुक्यातील उगावं येथील ज्ञानेश्वर घमाजी नेहरे या शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्माघाताने झालेला हा जिल्ह्यातील दुसरा बळी ठरला आहे

ज्ञानेश्वर नेहरे हे उगावं येथील भगवान पानगव्हाणे यांच्या द्राक्ष बागातील जुन्या  तोडलेल्या द्राक्षबागाची  लाकडे गोळा   काम करत असतांना दुपारी एक वाजेदरम्यान ते अचानक शेतातच कोसळले त्यांना तात्काळ उपचारासाठी निफाड येथील खाजगी रुग्णालयात  नेण्यात आले मात्र तपासणी केली‌ असता त्यांचा म्रुत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले .वाढत्या उन्हामुळे निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील राहुल रायतेचा १८ एप्रिल रोजी उष्माघाताने मृत्यू झाला होता त्यानंतर बारा दिवसात तालुक्यातील उगावं येथील ज्ञानेश्वर नेहरे या शेतमजुराचा उष्माघाताने दुसरा बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.