अंबरनाथचे श्री. अविनाश म्हात्रे ” सुनिर्मल गौरव ” पुरस्काराने सन्मानित !!!

अंबरनाथचे श्री. अविनाश म्हात्रे ” सुनिर्मल गौरव” पुरस्काराने सन्मानित !!!

मुंबई , प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ.श्री. चिंतामण रामदास म्हात्रे यांचे चिरंजीव श्री. अविनाश म्हात्रे यांना दि. 01 मे 2018 रोजी ” सुनिर्मल गौरव “ पुरस्काराने गौरविण्यात आले .
दि. 01/05/2018 रोजी धारावी मुंबई येथे सुनिर्मल फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सुनिर्मल गौरव पुरस्कार वितरणाचा भव्यदिव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता , या कार्यक्रमाला मा. आमदार श्री. बाबुराव माने , ज्येष्ठ साहित्यिक मा.डॉ. रोहिदास वाघमारे , भाजप मुंबई सचिव मा. दिव्या ढोले , धगधगती मुंबई चे संपादक मा. भिमराव धूलप , दलित मित्र मा. दादासाहेब शिंदे , साहित्यिक भगवान इंगळे व अनेक मान्यवर उपस्थित होते .

मला सुनिर्मल गौरव 2018 पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल तसेच माझी व माझे बाबा ज्येष्ठ समाजसेवक , ज्येष्ठ पत्रकार, पुर्ण महाराष्ट्रातून अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त डॉ. चिंतामण रामदास म्हात्रे व माझी आई स्व.सौ. निराताई म्हात्रे संपादिका कुष्ठमित्र यांच्या कुष्ठरोग सेवा व समाजकार्याची दखल घेतल्याबद्दल मी सुनिर्मल फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्ते व मा. श्री .खंदारे बंधूंचा अत्यंत आभारी आहे असे मनोगत श्री. अविनाश म्हात्रे यांनी महाराष्ट्र तेज न्युज प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले .

Leave a Reply

Your email address will not be published.