मनसे शाखा आणि गट अध्यक्षांची वणवण….मनसे वरिष्ठांवर गंभीर आरोप

मनसे शाखा आणि गट अध्यक्षांची वणवण….मनसे वरिष्ठांवर गंभीर आरोप
पक्षबांधणीला गळती-मनसे पालघर
पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामासत्र

ठाणे : प्रतिनिधी

मनसे पुनर्बांधणी आणि महाराष्ट्र दौरा करण्यासाठी निघालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पालघर जिल्हा पदाधिकारी यांनी मनसेच्या पदाचा सामुहिक राजीनामा देत. मनसेतील त्रिकुटाच्या लॉबीगने प्रामाणिक पदाधिकारी यांच्यावर अन्याय होत असल्याचा टाहो खुद्द मनसे प्रमुखांपुढे फोडला आहे. लॉबिंग पुढे सच्चे कायकर्ते हरले, पैसा जिंकला असल्याची व्यथा त्यांनी निवेदनात मांडली आहे. आशिष मेस्त्री पालघर उपजिल्हा अध्यक्ष यांनी थेट निवेदन दिले. पूर्वीच मनसेत शाखा अध्यक्ष आणि गट अध्यक्षांचा वणवा असतानाच पक्ष पुनर्बांधणी पूर्वीच पालघर जिल्ह्यात मनसेला गळती लागल्याने एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

१ मे पासून महाराष्ट्राचा दौरा सुरु करून पक्ष बांधणी करण्यासाठी निघालेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पालघर उपजिल्हा अध्यक्ष मेस्त्री यांनी दिलेल्या निवेदनाने आणि राजीनाम्याने धक्काच दिला. गेल्या महिनाभरात घडलेल्या घडामोडी आणि मनसेत अविनाश जाधव, राजन गावंड आणि कुंदन संखे यांच्या लॉबिंगवर निवेदनात आक्षेप नोंदविण्यात आला. मनसेत पैसा हा निकष ठेऊन पदे वाटण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मनसेत सच्चे कार्यकर्ते हरले, पैसा जिंकला असल्याचे निवेदनात सांगत राजीनामा देणाऱ्यानी पक्षाच्या वाटचालीला शुभेच्छाही दिल्या. एकंदर पदाधिकारी यांच्या राजीनामा सत्राने मनसेचे भवितव्य वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे.मनसे उपजिल्हा अध्यक्ष,उपतालुका अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, विभाग अध्यक्ष उप विभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष अशा १५ जणांचा या सामुहिक राजीनाम्यात समावेश आहे. पालघरच्या पदाधिकारी यांनी बंडाचे निशाण फड्काविल्याने उद्या ठाणे जिल्ह्यातही बंडाचे निशाण फडकण्याची शक्यता बळावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.