४ डिग्री पासुन ४० डिग्री पर्यंत निफाड चे तपमान : उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पोहण्यासाठी गर्दी…

४ डिग्री पासुन ४० डिग्री पर्यंत निफाड चे तपमान : उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पोहण्यासाठी गर्दी……

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण
महाबळेश्वर नंतर निफाड तालुका राज्यातील थंड तालुका म्हणून ओळखला जातो हिवाळ्यात ४ डिग्री तपमान तर उन्हाळ्यात ४० डिग्री तपमान,अंगाची लाही लाही करणाऱ्या कडाक्याचे ऊन,असह्य होणारा उकाडा कमी व्हावा यासाठी लासलगाव येथून पोहण्यासाठी खडक माळेगाव बंधारा येथे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढू लागली आहे. दोन व्यक्तींपासून सुरू झालेला स्विमिंग ग्रुप आता दीडशे लोकांचा समूह बनला आहे .

लासलगाव शहरात पोहण्यासाठी स्विमिंग पूल उपलब्ध नसून पोहण्याचा व्यायाम करण्यासाठी लासलगाव शहरातील व परिसरातील डॉक्टर इंजिनीयर शिक्षक पत्रकार शेतकरी व व्यापारी यांनी एकत्र येऊन स्विमिंग ग्रुप ची स्थापना केली आहे. लासलगाव शहरापासून १० किलोमीटरवर पिंपळगाव बसवंत रस्त्यावर खानगाव परिसरात खडक माळेगाव बंधारा येथे जात आहेत.

दिवसेंदिवस लासलगाव शहराचे तापमान वाढत चालले असून पारा चाळीसी ओलांडत असतांना या स्विमिंग ग्रुपमध्ये लहानांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत पोहणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून विद्यार्थीही पाण्यामध्ये पोहोण्याचा मनमुराद आनंद या ठिकाणी आता लुटू लागले आहेत.बंधाऱ्यामध्ये पोहणे हे धोक्याचे असते मात्र या स्विमिंग ग्रुपच्या वतीने येथे येणाऱ्या प्रत्येक सदस्याची पुरेपूर काळजी घेतली जाते योग्य ते साहित्यांचा वापर या ग्रुपच्या वतीने करण्यात येऊन भर उन्हाळ्यात वाढती गर्दी लक्षात घेता पोहण्यासाठी येणाऱ्यांना प्रशिक्षकां मार्फत मार्गदर्शनही केले जात आहे. पोहायला येणाऱ्यांसाठी या ग्रुपने पोशाखही सक्तीचा केला आहे.

ग्रुपतर्फे होतात मार्गदर्शन शिबिरे….

लासलगाव येथील स्विमिंग ग्रुपमध्ये सुमारे शंभर ते दीडशे सदस्य संख्या असल्याने या सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी तसेच आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा या संदर्भात विविध प्रकारचे मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात याचा फायदा सदस्यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे.

सकाळी हवेत गारवा दुपारी कडाक्याचे ऊन..

लासलगाव शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढत असताना पहाटेच्या सुमारास मात्र हवेत चांगलाच गारवा निर्माण होत असून दुपारी उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळपासूनच पोहणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे खडक माळेगाव बंधाऱ्यात परिसरातील नागरिक पोहण्याचा आनंद लुटत आहेत.

दोन वर्षे असे वाढले निफाड तालुक्यातील तापमान…..
दिनांक तपमान
२०१८ २०१७
30 मार्च ३९ ३७
१ एप्रिल ३८ ३७
२ एप्रिल ३८.८ ३७.६
३ एप्रिल ३९ ३८.५
४ एप्रिल ३८.६ ३९.४

दोन वर्षात तापमानात झाले मोठे बदल…….

निफाड तालुका हा थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखला जातो 12 जानेवारी 2017 रोजी निफाड तालुक्याचे तापमान ४ डिग्री पर्यंत घसरले होते. त्यावेळी थंडीची हुडहुडी निफाड करांना भरली होती तर सन 2016 मध्ये निफाड चे तपमान 41.6 डिग्री पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे निफाड तालुक्यात गेल्या दोन वर्षात तापमानात फार मोठे बदल बघायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.