छगनराव भुजबळ यांच्या भेटी साठी त्यांचे कट्टर समर्थक व सध्या शिवसेनेत असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आज मुंबईत दाखल

छगनराव भुजबळ यांच्या भेटी साठी त्यांचे कट्टर समर्थक व सध्या शिवसेनेत असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आज मुंबईत दाखल

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार छगनराव भुजबळ यांच्या भेटी साठी त्यांचे कट्टर समर्थक व सध्या शिवसेनेत असलेले लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर आज मुंबईत दाखल झाल्याने लासलगावसह येवला मतदार संघातील राजकीय नेते व कार्यकर्ते यांच्या भुवया उंचावल्या आहेत तसेच त्यांच्या सोबत लासलगावचे माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा,किशोर गोसावी यांच्या सह अनेक जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी छगनराव भुजबळ हे तुरुंगात असतानाच त्यांचे निकटचे लासलगाव परिसरातील विविध जेष्ठ नेते वेगवेगळ्या पक्षात दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकेकाळी नेत्यांची जी कमालीची भाऊगर्दी होती ती बऱ्या पैकी कमी झाली. त्यातील बरेच कट्टर नेते भारतीय जनता पक्षात दाखल झाले.तसेच लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर व तत्कालिन उपसभापती बाळासाहेब क्षीरसागर शिवसेनेत दाखल झाले आहेत. लासलगाव बाजार समितीत पुनश्च छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने सत्ता पुर्ववत काबीज केली त्यानंतर सभापतिपद विश्वासपात्र सहकारी म्हणून जयदत्त होळकर यांना पसंती दिली होती.भुजबळ तुरुंगात असतानाच निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी त्यांना शिवसेनेत दाखल करून त्यांच्या पत्नी सौ.वेदिका होळकर यांनी लासलगाव जि.प.गटातून शिवसेना उमेदवार म्हणून निवडणुक लढविली होती.
मुंबई येथे तब्येतीची विचारपुस करण्यास गेलेल्या लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांना मतदार संघातील स्थितीचा बारकाईने आढावा घेत छायाचित्रे काढतांना जवळ घेत आमदार छगनराव भुजबळ यांनी अगदी जवळ घेऊन मुलाखती दिल्या या फोटो व बातम्या सोशल मिडीयावर दिवसभर चर्चेत आहे.त्यामुळे आता लवकरच राष्ट्रवादी पक्ष येवला व लासलगाव परिसरातील गावामध्ये प्रबळ होईल असे दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published.