तिसऱ्या आंतरराष्ट्रीय  लघुचित्रपट महोत्सव पुणे मध्ये होणार विश्वविक्रम

तिसऱ्या आंतरराष्ट्रीय  लघुचित्रपट महोत्सव पुणे मध्ये होणार विश्वविक्रम

पुणे : १० मे २०१८  चित्रपट निर्मिती क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी पुर्व परिक्षा म्हणून लघुपट निर्मिती कडे पाहिले जाते. लघुपट निर्मिती हे एक असे माध्यम आहे ज्यामधून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आशय लोकांसमोर मांडता येतो.  बऱ्याच लघुपटांमधून सामाजिक प्रबोधन ही केले जाते. अशाच प्रकारच्या सर्व लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शिवस्वराज्य प्रतिष्ठान आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करीत आहे.दोन वर्षे मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर या वर्षी शिवस्वराज्य प्रतिष्ठानने  तिसरा  आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव पुणे २०१८ मध्ये विश्वविक्रम करण्याचा संकल्प केला आहे. यासंबंधित प्रतिष्ठान चे अध्यक्ष अमोल भगत आणि प्रमुख ज्युरी डॉ.मधुसूदन घाणेकरयांनी ,गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् आणि लिमकाबुक ऑफ रेकॉर्डस् यांच्याशी संपर्क करून आज पत्रकारपरिषदेमधे माहिती दिली. 

प्रतिष्ठानकडे आतापर्यंत भारतासह २७ देशातून एकूण एक हजार लघुपट आले आहेत. या महोत्सवामध्ये ११११ लघुपट प्रदर्शित करून  विश्वविक्रम  नोंदविला जाणार आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  तसेच विजेत्यांना रोख पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र सिनेमा सृष्टीतील  दिग्ग्ज कलाकारांच्या हस्ते दिले जाईल . या विश्वविक्रमी स्पर्धेमध्ये आपला सहभाग असावा या सुवर्णक्षणाचे आपण साक्षीदार असावे म्हणून लघुपट निर्मिती करणाऱ्या स्पर्धाकांनी तीस मे  पर्यंत आपला सहभाग द्यावा. या लघुचित्रपटांचे स्क्रीनिंग विजय चित्रपटगृह , पुणे येथे  एक सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या कालावधी मध्ये होणार आहे. तसेच बक्षीस वितरण समारंभ गणेश कलामंच स्वारगेट येथे 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या विश्वविक्रम स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवावा अशी आपेक्षा शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष  अमोल भगत यांनी व्यक्त केली  आहे.पत्रकार परिषदेस अमोल डोळे , सिंगर पी .शंकरम ,राकेश गरुड ,प्रतीक मुरकुटे, सुरज शिंदे आदीप्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते .अधिकमाहितीसाठी संपर्क  ७२४९४१७९६५www.isfilmfestivalpune.in

Leave a Reply

Your email address will not be published.