कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करणार जिल्हाभर जनजागर……. राजाराम पाणगव्हाने

कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करणार जिल्हाभर जनजागर……. राजाराम पाणगव्हाने

लासलगाव(वार्ताहर)समीर पठाण
जिल्ह्यातील काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेस नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचा पूर्ण पाठिंबा असेल तसेच या जागर संपर्क यात्रेत जिल्हाभरातून जास्तीत जास्तीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी,युवकांनी सहभागी होऊन काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले.
लासलगाव-पाटोदा मार्गावरील चांदर पाटील मंगल कार्यालयात जिल्हा संनियंत्रन समितीचे अध्यक्ष गुणवंत हाेळकर व येवला विधानसभा युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष डॉ. विकास चांदर यांच्या वतीने आयोजित काँग्रेस कार्यकर्ता जागर संपर्क मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.नयना गावित,शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष एड. आकाश छाजेड, लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राहुल दिवे,जिल्हा परिषद सदस्या रेखा पवार,अश्विनी आहेर,जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील आव्हाड,जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, राजेंद्र मोगल,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गुणवंतराव होळकर,जिल्हा युवक काँग्रेस माजी अध्यक्षा साधना जाधव,राजेंद्र माेगल,प्रदेश एनएसयुआय सरचिटणीस नितीन काकड,प्रदेश युवक काँग्रेस सचिव स्वप्नील पाटील,नाशिक जिल्हा एनएसयुआय अध्यक्ष राहुल कदम,उपाध्यक्ष कुशल लुथरा,युवक काँग्रेस लोकसभा अध्यक्ष सचिन कोठावदे,जिल्हा इंटक अध्यक्ष भास्कर गुंजाळ,प्रकाश अडसरे यांचीही कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ.नयना गावित यांनी काँग्रेसला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यातील महिला व युवतींचीही साथ आवश्यक असून त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच काँग्रेसच्या माध्यमातून ‘पंचायत राज ‘ या संकल्पनेचाही प्रसार जिल्हाभरात करण्यासाठी मेहनत घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात गुणवंत हाेळकर यांनी,जुन्या व नवीन कार्यकर्त्यांना एकत्र आणून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी एकदिलाने काम करण्यासाठी जिल्ह्यातील युवा कायकर्ते तयार आहेत. या युवाशक्तीला प्रोत्साहन देऊन सरकारविरोधात जोरदार लढाई लढायची वेळ आली असून या संपर्क यात्रेच्या माध्यमातून त्यादृष्टीने पहिले पाऊल उचलले असल्याचे सांगितले.
येवला विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. विकास चांदर यांनी काँग्रेसच्या या जागर संपर्क यात्रेत युवक काँग्रेसही हिरीरीने साथ देण्याचे आश्वासन देऊन, नवीन नेते, युवा नेतृत्व तयार करायचे असेल तर काँग्रेसने युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भविष्यात ताकद देणे गरजेचे आहे,असेही सांगितले.काँग्रेसच्या या कार्यकर्ता जागर संपर्क यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या अन्यायकारक धोरणांवर कडाडून हल्लाबोल चढविण्यात येणार अाहे.

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गुणवंत होळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.येवला विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विकास चांदर पाटील यांनी आभार मानले.यावेळी मधुकर शेलार,समाधान पाटील, एकनाथ गायकवाड,अरुण आहेर,महेश बाफणा, जितेंद्र बाजारे,नानासाहेब शिंदे,उस्मानभाई शेख, राजेश भंडारी,विजय कदम,तुषार सोनकांबळे,सोनू पठाण,नीराज शेख,पंकज आबड,सतीश चव्हाण, विशाल चांदर,कैलास केदारे,मिरान पठाण,अर्षद पठाण,सोनू शेजवळ यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.विश्वजीत कदम यांच्या अभिनंदनाचा ठराव –

सदर मेळाव्यात निधानसभेवर मा.विश्वजीत कदम यांची बिनविराेध निवड झाल्या बद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.
आगामी लाेकसभा निनडणुकीत नाशिक लाेकसभा मतदार संघ कॉंग्रेस ला साेडण्यात यावा व येथुन श्री. राजारामजी पाणगव्हाने यांना उमेदवारी देण्यात यावी. अशीहि मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.