कल्याणतील भाविकांवर काळाचा घाला मिनी बसला भीषण अपघात; १० ठार तर १३ जखमी;सर्व केडीएमसीचे  कामगार

कल्याणतील भाविकांवर काळाचा घाला
मिनी बसला भीषण अपघात; १० ठार तर १३ जखमी;सर्व केडीएमसीचे  कामगार

 

कल्याण , ( शरद घुडे ) : उज्जैन येथून देवदर्शन करुन परतत असताना कल्याण मधील १० भाविकांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील आडगाव शिवारात गुरुवारी पहाटे सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात महिला, दोन पुरुष, एक लहान मुलाचा समावेश आहे. काही जण केडीएमसी चे कामगार आहेत
मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्व जण कल्याण परिसरातील रहिवासी असून कल्याण – डोंबिवली महापालिकेत सफाई कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका कल्याण मुख्यालया मागील सफाई कामगार वसाहतीमधील तर काही कल्याण पश्चिमेकडील संतोषीमाता रोडवरील १५ खोलीमध्ये राहणारे रहिवाशी होते. या घटनेमुळे कामगार वसाहतीत शोककळा पसरली आहे.
उल्हासनगरच्या साई ट्रॅव्हल्सची मिनी बस क्रमांक एमएच ०५ सी. के. ३५७ ही बस भाड्याने घेवून सोमवारी बस चालक संतोष किसन पिठले (रा. उल्हासनगर) हा घेवून सुमारे २२ भाविकांना घेऊन मध्यप्रदेश राज्यातील ओंकारेश्वर, महाकालेश्वर उज्जैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन सर्व भाविक उज्जैन येथून परतीचा प्रवास करीत असताना चांदवड तालुक्यातील आडगाव शिवारानजीक पहाटेच्या सुमारास मिनी बसचे अचानक टायर फुटले, यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटून उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली.
गीता कालिदास वासोदा (३८, कल्याण) राधी तुळशी राठोड (४०) जमना गोविंद चव्हाण (७०) मंजू सुनील गुजराती (३१)प्रगती सुनील गुजराती (१२) कशिक प्रकाश घाव (१४) कल्याण बिंदिया पानु गुजराती (६० नाशिक),  धनु मधुकर परमार (६०, नाशिक) वसु लक्ष्मण दुमय्या (५४,कांदिवली),ब्रिजेश मल्होत्रा ( २०, कांदिवली), अजय मल्होत्रा (४५,कल्याण) मिनी बस चालक संतोष पिठले सह १२ जणांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहे. तर १० मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आज सायंकाळपर्यत त्यांचे मृतदेह कल्याणमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल होणार असल्याची माहिती मृतकाच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेने सफाई कामगारांमध्ये शोककळा पसरली महापालिकेच्या कामगारवर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.