झाडांच्या रोपांनी तुला करून मुलांनी केला वडिलांचा 75 वा वाढदिवस साजरा

झाडांच्या रोपांनी तुला करून मुलांनी केला वडिलांचा 75 वा वाढदिवस साजरा

कल्याण , ( किरण सोनवणे ) :  नेत्यांचे वाढदिवस पुस्तक तुला, मिठाई तुला, कपडे तुला करून केल्याचे आपण ऐकतो, मात्र आपल्या वडिलांचा 75 वा वाढदिवस हा त्यांच्या मुलांनी वृक्ष तुला करून केला आणि येणाऱ्या प्रत्येक नातेवाईक आणि मित्राना कुंडी सकट झाडाचे रोप देऊन पर्यावरण आठवड्यात आगळा वेगळा संदेश दिला आहे
ही घटना आहे कल्याण पश्चिम येथील, रेल्वेतून मोटार मन म्हणून सेवा निवृत्त झालेल्या वामनराव विसावे यांच्या वाढदिवसाची.
मुली-मुले, नातवंडे यांनी एकत्रित येऊन वामनराव यांचा अमृत महोत्सव साजरा करण्याची व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरविले.
वामनरावांना वृक्ष लावण्याचे आणि जोपासण्याचे भारी वेड त्यांनी जिथे जिथे नौकरी केली तिथे असंख्य झाडे लावली आणि परिसरात सुद्धा झाडे लावणे त्याची देखभाल करणे हा त्यांचा आवडता छंद, मग त्यांचा वाढदिवस झाडांच्या रोपानी तुला करण्याची कल्पना पुढे आली आणि त्यांच्या दोन मुली ललिता मोरे आणि कविता महाले यांनी यासर्व नियोजनाची जबाबदारी घेऊन, कल्याण येथील सहकार भवन हॉल मध्ये हा आगळा वेगळा वाढदिवस संपन्न झाला.
यावेळी सुमारे 500 पाहुण्यांना कुंडी सकट झाडाचे रोप भेट देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.
सद्या पर्यावरणाची मोठी हानी होत आहे, हवा पाणी, माती सर्वांचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, अश्या वेळी प्रत्येक व्यक्तीने खूप नाही पण आपल्या वाढदिवसाला 5 झाडे लावली तर सगळा देश हिरवागार होईल .
राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि आध्यात्मिक संघटनांशी संबंधित अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published.