राज्यभरातील दोन हजार कोटींच्या बनावटविमा घोटाळ्याची सचिव स्तरावर चौकशीः ना.रावते

राज्यभरातील दोन हजार कोटींच्या बनावटविमा घोटाळ्याची सचिव स्तरावर चौकशीः ना.रावते

 

 

नाशिक आरटीओत शंभर कोटींचा घोटाळा

मुंबई/विशेष प्रतिनिधी :
नाशिकसह राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अंदाजे २००० कोटींच्या बनावट विमा पाॕलीसी घोटाळ्याची सचिव स्तरावर चौकशी करण्याचे आदेश परिवहन मंञी ना.दिवाकर रावते यांनी महाराष्ट्र राज्य पञकार महासंघ आणि शाहीमुद्रा प्रतिष्ठान यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर दिले.गेल्या पाच वर्षात नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात अंदाजे शंभर कोटी तर महाराष्ट्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुमारे दोन हजार कोटी रूपयांचा बनावट विमा पाॕलीसी घोटाळा झाला असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य पञकार महासंघ आणि शाहीमुद्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने ना.दिवाकर रावते यांना निवेदनाद्वारे दिली तेंव्हा झालेल्या सविस्तर चर्चेत ना.रावते यांनी शिष्टमंडळाच्या आरोपाला दुजोरा देत हा घोटाळा केवळ नाशिक पुरता मर्यादीत दिसत नसल्याचे सांगून महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयातील विमा पाॕलीसीची चौकशी सचिव पातळीवर करण्याचे निर्देश दिले.
ना.रावते यांना दिलेल्या निवेदनवजा तक्रारीसोबत बनावट पाॕलीसीचे पुरावेही सादर करण्यात आले.
या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष डाॕ.राहुल जैन बागमार ,जनरल सेक्रेटरी कुमार कडलग,मुंबई-कोकण विभागाचे अध्यक्ष डाॕ.बिनु वर्गीस,नाशिक जिल्हाध्यक्ष महेश थोरात,कार्यकारीणी सदस्य सतिश रूपवते,गुलाब मणियार संदीप द्विवेदी, ठाणे जिल्ह्याचे कार्यकारीणी सदस्य श्यामभाऊ जांबोलीकर ,शरद घुडे आदींचा सहभाग होता.

चोरांच्या उलट्या बोंबाः

नाशिकमध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात एका कंपनीने एक महिन्यापुर्वी शाहिमुद्रा प्रतिष्ठाने दिलेल्या पत्रावरुन बनावट विमा पाॕलीसी प्रकरणी तक्रार दाखल केली होती.महिनाभर त्या तक्रारीवर कुठलीच कारवाई झाली नाही.माञ दोन दिवसापुर्वी नाशिक आरटीओने साक्षात्कार झाल्याप्रमाणे दोन विमा पाॕलीसी बनावट असल्याचे शोधून तो गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.जे पाच वर्ष सापडले नाही ते दोन दिवासापुर्वी सापडल्याने सारा मामला संशयास्पद असून पोलीस यंञणेतील आरटीओच्या खबर्यांनी महिनाभरापुर्वीची तक्रार आरटीओ पर्यंत पोहचवली. सदर रॅकेटमध्ये असलेलावआपला सहभाग लपवण्यासाठी व संभाव्य कारवाई टाळण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची नौटंकी करून उलट्या बोंबा मारण्यास सुरूवात केली आहे.

“व्यापक जनहित नजरेसमोर ठेवून महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाने हाती घेतलेला हा मुद्दा खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणारा आहे.राज्यकर्ता म्हणून या मुद्दाला न्याय देणे माझे पहिले कर्तव्य आहे,म्हणूनच या बनावट विमा पाॕलीसीचे राज्यव्यापी पाळेमुळे खणून काढण्यासाठी सचिव पातळीवर चौकशीचे आदेश देतो.”
ना.दिवाकर रावते,
परिवहन मंञी

“बनावट विमा पाॕलीसीचा मुद्दा अतिशय गंभीर असून अपघाती मृत्यूची भरपाई देतांना निर्माण होणारा पेच गंभीर आहे.वाहन मालक-आरटीओ कार्यालयातील दलाल आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी ,अधिकारी यांची साखळी या बनावट विमा पाॕलीसी प्रक्रीयेत सहभागी असण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही.यासंदर्भात आम्ही आरटीओकडून मिळालेल्या वाहन माहीतीवरून विमा पाॕलीसीची संबंधित विमा कंपनीकडे चौकशी केली असता बहुतांश पाॕलीसी फेक असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.नाशिकमध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात विमा कंपनीने तक्रार दाखल केल्यानंतर महीनाभर कुठलीही कारवाई झाली नाही.याउलट दोन दिवसापुर्वी नाशिक आरटीओने अशाच प्रकारची एक तक्रार दाखल करून अधिकारी व कर्मचारी यांचा सदर रॅकेट मधील सहभाग लपवण्याचा केवीलवाना प्रयत्न करीत आहे .
म्हणूनच या रॕकेटची संपूर्ण चौकशी आम्ही ना.दिवाकर रावते यांना मागीतली.संपुर्ण विषय समजून घेत सचिव पातळीवर चौकशीचे आदेश दिल्याने समाजहिताचा न्याय होईल ,अशी खाञी आहे,”
डाॕ.राहुल जैन- बागमार
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ

आशिषकुमार न्याय देतील
पुर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान सचिव म्हणून काम करताना आशिषकुमार सिंह यांनी मनोरा आमदार निवास,मंञालय डेब्रीज आणि उंदीर घोटाळा चौकशीत पारदर्शकपणे काम करून चौकशी अहवाल सादर करून घेतला होता.कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले आशिषकुमार सिंह सध्या परिवहन सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या पातळीवर होणार्या बनावट विमा पाॕलीसी घोटाळ्याच्या चौकशीला नक्कीच न्याय मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.