मुंबई पालिकेत नौकरीचे  अमिष  दाखवून  ३६ बेरोजगारांना घातला ५४ लाखाचा गंडा

मुंबई पालिकेत नौकरीचे  अमिष  दाखवून  ३६ बेरोजगारांना घातला ५४ लाखाचा गंडा

चौकडीला अटक- महिला आरोपी फरार  

 

ठाणे : प्रतिनिधी
मुंबई महानगर पालिकेचा आस्थापना अधिकारी असल्याचे भासवून ३६  जणांना महापालिकेत कामाला  लावण्याचे आमिष  दाखवून ५४ लाख ४७ हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.  याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पोलीस पथकाने ४ आरोपीच्या मुसक्या आवळल्या.  या आरोपीना  न्यायालयात नेले असता ३ ऑक्टोबर  पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या टोळीतील  फरारी  महिला आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याची  माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त  दीपक देवराज यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत  दिली.

फिर्यादी श्रीकांत प्रभाकर जोईल  यांचा  मुलगा , मुलगी , पुतण्या नातेवाइक  व इतर परिचयाच्या १४ जणांना महापालिकेत  नोकरी लावण्याचे आमिष  दाखवून त्यांना  बनावट सह्या असलेले मुंबई पालिकेचे  खोटे  नियुक्तीपत्र,  मेडिकल लेटर , जॉइनिंग लेटर  देऊन त्यांच्याकडून १८ लाख ५ हजार रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. या फसवणूक प्रकरणी  ठाणे नगर पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबर रोजी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला . सादर प्रकरणाबाबत  ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाला  गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी  दत्तप्रसाद  उर्फ तुषार धुरी हा त्याचे गावी सिधुदुर्ग येथे पळून गेल्याची तसेच इतर आरोपी हे डोंबिवली येथे असल्याची खात्रीलायक  माहिती मिळाली ,  मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेने  दोन पथके तयार करून सिधुदुर्ग आणि डोंबिवली येथे रवाना केली. यापैकी डोंबीवलीतील  पथकाने

राहुल चंद्रकांत केळकर , प्रकाश भगवान गायकवाड यां दोघांना  २६ सप्टेंबरला अटक केली.  तसेच दुसऱ्या पथकाने  २७ सप्टेंबरला  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  देवगड तालुक्यातील पायरे गावातून धुरी याला  आणि  मुलुंड यथे राहणारा आरोपी अनिकेत अनिल राणे (२१) याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बिडवाडी येथून अटक केली. या आरोपीचे साथीदार प्रिया गायकवाड हि अद्याप फरार असून त्यांचा शोध गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांचे पथक मागोवा घेत आहे. लवकरच हि फरारी महिला आरोपी गजाआड होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.