उल्हासनगरात दिवसा ढवळ्या डोके ठेचून हत्या !!! दोन आरोपी ताब्यात तर एक फरार

उल्हासनगरात दिवसा ढवळ्या डोके ठेचून हत्या !!!
दोन आरोपी ताब्यात तर एक फरार

उल्हासनगर , ( शरद घुडे ) :
भरदिवसा डोक्यावर पेव्हर ब्लॉक मारून एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना उल्हासनगर च्या मधोमध असलेल्या गोलमैदान परिसरात घडली आहे . प्रत्यदर्शी साक्षीदारांच्या जबानी वरुन असे कळले की गोलमैदान स्थितीत प्रभाग समिती क्रमांक एक समोर दुपारी दोन वाजता किरकोळ कारणांमुळे चौघांमध्ये म्हणजे मयत राजु लोंढे , आरोपी राहुल सोनु कांबडिया ( 23 ) , सोनु उज्जेनवाल , व रूपेश यांच्यात वाद झाला व त्या तीन आरोपींनी राजु लोंढे यास मारहाण केली व आरोपी राहुल याने तिथेच पडलेल्या पेव्हर ब्लॉक लादी जोरात मयत राजुच्या डोक्यात मारली व वर्मी घाव लागून त्याचा जागेवर म्रुत्यु झाला व तिघेही आरोपी तेथून फरार झाले .
प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तिघा आरोपी विरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गु.र.न |232/ 2018 , भा.दं.वि.सं 302 , 323 ,34 , प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . उल्हासनगर पोलीस तपास करत असतानाच गुन्हे शाखा घटक – 4 ने या गुन्ह्याचा समांतर तपास करत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि.02/10/2018 रोजी वपोनी श्री. महेश तरडे यांच्या आदेशानुसार  यांनी सापळा रचून चार्ली वेफर्स चे दुकानासमोर उल्हासनगर – 1 येथून मुख्य आरोपी राहुल उर्फ चड्डु यास अवघ्या तीन तासात अटक केली असुन त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे . तसेच सोनु उज्जेनवाल यास उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे व आरोपी रूपेश हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published.