पाच सोनसाखळी चोरट्यांंना 20.57 लाखाच्या मुद्देमालासह अटक 

पाच सोनसाखळी चोरट्यांंना 20.57 लाखाच्या मुद्देमालासह अटक 

ठाणे , ( शरद घुडे ) : 
रात्री जेवण आटोपल्यानंतर 9 ते 11 वाजण्याच्या दरम्यान शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिला आणि नेक टीशर्ट परिधान केलेल्या पुरुषाला हेरून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या एका टोळीतील दुकलीला आणि दुसऱ्या टोळीतील त्रिकुट अशा पाच जणांच्या टोळीला 636 ग्राम सोन्याच्या दागिन्यांच्या ऐवजांसह सहा  मोटरबाईक असा 20 लाख 57 हजाराचा मुद्देमाल हस्तगत  केला असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 28 सप्टेंबर रोजी अटक दुकली आरोपींंनी  18 गुन्ह्याची कबुली दिली. तर दुसऱ्या टोळीतील त्रिकुटाने 9 गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. प्रथम अटक दुकलीला 8 अक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी आहे.
            मीरा-भायंदर परिसरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या. या घटनांना आळा  घालण्यासाठी ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आसपासच्या इमारतीत लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही केमेरे तपासणी केली असता सीसी पुटेजमध्ये आरोपी परशुराम देजू सॅलियन(32) रा. शाश्वत बिल्डिंग, क्र 8 , अग्रवाल लाईफ स्टाईल, नारंगी रॉड, विरार त्याचा साथीदार आनंदकुमार उर्फ मोनू समर बहादूर सिंह(28) रा. एमएमआरडी कॉलोनी, पूनम नगर, अंधेरी(पु) मुंबई  असल्याचे निष्पन्न झाले.  खबऱ्याकडून त्याची माहिती घेतली असता दोघेही सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघांचे शिक्षण  10 वी व 12 वी पर्यंत   झाले आहे. त्यांना नयनगर पोलीस ठाण्यात रॉबरी   प्रकरणात अटक करण्यात आली होती. या दोघे मुंबईच्या आर्थररोड कारागृहात मित्र झाले आणि त्यांनी नयानगर पोलीस ठाणे  -5, मीरारोड पोलीस ठाणे-3, काशिमीरा पोलीस ठाणे-9 आणि भाईंदर पोलीस ठाणे 1 असे 18 गुन्हे केल्याची या आरोपींची चौकशीत कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील 446  ग्राम सोन्याचा ऐवज आणि 40 हजाराची पल्सर मोटरबाईक असा 13 लाख 43 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांना न्यायालयात नेले असता न्यायालयाने दोघांना 8 अक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
            त्यानंतर दुसऱ्या घटनेत खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक खर्डी शहापूर परिसरात राहणाऱ्या कुंजवाल गोकुळ सांडे (21) रा. बागेचा पाडा खर्डी, ता-शहापूर हा आपल्या साथीदारांसोबत शहापूर, पडघा, गणेशपुरी,वशिंद, कल्याण, भिवंडी परिसरात मोटरबाईक आणि सोनसाखळी चोरी करतो अशी माहिती मिळताच पोलिसांनी सांडे सोबत त्वरित अन्य आरोपी गोविंद उर्फ पप्या दत्ता धमके ( 27, साजीवली, ता. शहापूर), विजय मार्तंड सातपुते (25, साजीवली, ता. शहापूर) याना पोलिसांनी अटक केली. त्यांनी चौकशीत मोटरबाईक चोरीचे चार आणि 5 सोनसाखळी चोरीचे असे  9  गुन्हे केल्याची कबुली दिली. या त्रिकुटाने वाशिंद,पडघा,शहापूर,गणेशपुरी,भिवंडी प्रत्येकी एक असे 5 गुन्हे सोनसाखळी चोरीचे केले होते. पोलीस पथकाने त्यांच्याकडून 190 ग्राम सोन्याचा ऐवज आणि मोटारबाईक असा 7 लाख 13 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल हसतात केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांच्या दोन कारवाईत 5 आरोपीना गजाआड केले. तर त्यांच्याकडून 20 लाख 57 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. या अटक त्रिकुटापैकी विजय सातपुते हा बॉक्सर म्हणून काम करीत होता. तर गोविंद उर्फ पप्या दत्ता धमके हा पेपर मिलमध्ये काम करीत असल्याचे निष्पन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published.