खोपट टीएमटी बसस्थानकावर बसलेल्या तरुणाचा रहस्यमय मृत्यू 

खोपट टीएमटी बसस्थानकावर बसलेल्या तरुणाचा रहस्यमय मृत्यू 
ठाणे ,( शरद घुडे ) : 
ठाण्याच्या खोपट परिसरातील टीएमटीच्या बसस्टोपवर बसलेल्या ३५ ते ४० वर्षाच्या तरुणाचा बसल्याजागी झालेल्या रहस्यमय मृत्यूने एकच  खळबळ उडाली. मृतकाचे नाव दोस्त मोहम्मद सलमानी (४०) असे नाव असून त्याचा मृत्यू कशाने झाला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.हि घटना सोमवारी दुपारी साडे तिच्या सुमारास घडली.  सलमानीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र ठाण्यात विजेच्या शॉकने मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. या मृत्यूची नोंद नौपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
           सोमवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास खोपट परिसरातील एसटी वर्क्सशॉप च्या समोर  असलेल्या टीएमटी बसचा थांबा आहे. येथे बसलेला दोस्त मोहम्मद सलमानी रा. राजीव गांधी नगर, सोनापूर चाळ, भांडुप (प) मुंबई याचा बसल्या जागेवरच मृत्यू झाला. बसथांब्यावर होर्डिंगला विजेचा पुरवठा करणाऱ्या विद्युत बॉक्स  होता. सलमानी याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची किंवा वीजपुरवठा करणाऱ्या बसथांब्यावरील विद्युत बॉक्समधील विद्युत वायर थांब्याला  लागली आणि विजेच्या झटक्याने मृत्यू झाला असावा असा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान नौपाडा पोलीस ठाण्यात या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात  आली  असून मृतकाच्या शवविच्छेदनाच्या आवाहलानंतर स्पष्ट होणार आहे. सलमानीचा मृत्यू कशाने झाला याचा शोध पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.