छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवा महाले यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवा महाले यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी.

उल्हासनगर , ( शरद घुडे ) :  अखिल भारतीय जिवा सेनेच्या वतीने वीर जिजामाता उद्यान,मराठा सेक्शन, उल्हासनगर – 4 येथिल शिवस्रुष्टी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांचे अंगरक्षक शिवरत्न वीर जिवा महाले यांची 383 वी जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.


प्रभाग क्रमांक 14 चे शिवसेना नगरसेवक श्री.अरुण आशाण, श्री. शेखर यादव ,अखिल भारतीय जिवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री.मनोज कोरडे आणि श्री.निकम सर यांच्या शुभ हस्ते शिवस्रुष्टी मधिल शिवरत्न वीर जिवा महाले यांच्या भिंती शिल्पाचे पुजन करण्यात येऊन राष्ट्र माता जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले.

अखिल भारतीय जिवा सेनेचे उल्हासनगर तालुका अध्यक्ष श्री.मंगेश सायखेडे व उल्हासनगर नवनिर्वाचित शहर अध्यक्ष श्री.सागर पगारे यांच्या वतीने जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात श्री संत सेना महाराज पतपेढी चे अध्यक्ष श्री.रामकीशन रावताळे,नाभिक समाच्याचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.पांडुरंग राऊत व श्री.बापु सुरवसे आणि उल्हासनगर नाभिक सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री.अमोल अबुसकर तसेच नाभिक आरक्षण समितीचे श्री.संतोष खंडागळे यांच्या सह मोठ्या संख्येने नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.संदिप सायखेडे,श्री.सचिन पवार,श्री.अंकुश श्रीखंडे, श्री.दिनेश सोनावळे ,श्री.सतिश महाले यांनी अथक परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.