सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी परत केली तब्बल 2 तोळ्यांची सोन्याची साखळी

सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांनी परत केली तब्बल 2 तोळ्यांची सोन्याची साखळी
 
सोन्याची साखळी परत करून दाखवला प्रामाणिकपणा
ठाणे : प्रतिनिधी :
         सध्याच्या युगात प्रामाणिक माणसे कमी नाहीत. यांची प्रचिती ठाणे महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी आणि कर्मचारी यांनी करून दिली. 24 तारखेच्या दिवशी महापालिकेच्या गेट नं 1 जवळ सुरक्षा रक्षक दादासो धनावडे आणि सुरक्षा पर्यवेक्षक शरद राखिबे आपली जबाबदारी पार पाडत होते.आपले कर्तव्य बजावीत असताना त्याच दिवशी संध्याकाळी 7 च्या सुमारास तब्बल 2 तोळ्याची म्हणजेच 59 हजार रुपयांची गळ्यातील सोन्याची साखळी त्यांना मिळाली. ही सोन्याची साखळी त्यांनी स्वतःकडे न ठेवता आपल्या वरिष्ठ अधिकारी प्रमोद भोसले यांच्याकडे सुपूर्द केली.त्यानंतर ही सोन्याची साखळी ठाणे महापालिकेत रिक्षा वाहन म्हणून काम करणारे नामदेव शंकर यादव यांची असल्याने समोर आली.
         नित्यनेमाने नामदेव यादव संध्याकाळी 7 च्या सुमारास आपले काम आटपून घरी जात होते. दरम्यान त्याच्या गळ्यातील तब्बल 2 तोळ्याची सोन्याची साखळी महापालिकेच्या गेट नं 1 जवळ पडली, घरी आल्यानंतर आपल्या गळ्यातील साखळी पडली असल्याची जाणीव त्याना झाली. दरम्यान खूप शोधाशोध केल्यानंतर साखळी काही सापडली नाही.सोन्याची साखळी गेल्यामुळे यादव यांना त्यारात्री झोप देखील आली नाही, आपल्या नशीबात असेल तर ती मिळेल असे त्याच्या कुटूंबियांनी सांगितले. दरम्यान दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर येण्यासाठी आले असता पालिकेच्या गेट जवळ चौकशी केली असता महाराष्ट्र सुरक्षा बलचे सुरक्षा अधिकारी प्रमोद भोसले यांनी माझ्याकडे एक वस्तू असल्याचे सांगितले. दरम्यान सोनसाखळीची ओळख पटवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते नामदेव यादव यांना देण्यात आली.
क्षणभर एखादी वस्तू नजरेआड झाली तर तिच्यावर नजर ठेवणाऱ्या वृत्तीची माणसे पावलोपावली बघायला मिळतात. साधा पेन अगदी रुमालही अलगद उचलणारी व्यक्ती दिसतात.मात्र या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सोन्याला किंमत न देता सोनसाखळी परत केली. या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.