कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षण देण्यास कटीबध्दः ना.चंद्रकांत दादा पाटील

कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षण देण्यास कटीबध्दः ना.चंद्रकांत दादा पाटील

डाॕ.पंजाबराव देशमुख वस्तीगृह नाशिककर विद्यार्थीअर्पण

 

नाशिक/प्रतिनिधी
कायद्याच्या चौकटीत कायम टिकेल या दर्जाचे मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाजपचे सरकार वचनबध्द आहे,तथापी आरक्षणातून जे फायदे मिळू शकतात त्यापेक्षा अधिक सोयीसवलती मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी आधीच देऊ केल्या आहेत.अशा शब्दात विद्यमान सरकार मराठा समाजाविषयी सकारात्मक असल्याचा विश्वास महसुला मंञी ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी नाशिकच्या विचारपीठावरून दिला.डाॕ.पंजाबराव देशमुख विद्यार्थी वस्तीगृह शुभारंभप्रसंगी ना.पाटील बोलत होते.
मराठा समाज आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गेले काही दिवस आक्रमक झाला असतांना आरक्षण मुद्दा कायद्याच्या कचाट्यात अडकू लागल्याने समाजाचा रोष वाढू लागला होता.हा रोष कमी करण्यासाठी मुख्यमंञ्यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंञीस्तरीय उपसमिती स्थापन करून या समितीला मार्ग काढण्याचे अधिकार दिले.आरक्षण देणे या उपसमितीच्या आवाक्यात नसल्याने कायदेशीर गुंता सुटेपर्यंत मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी काही महत्वपुर्ण निर्णय घेतले.विद्यार्थांना ६०५ अभ्यासक्रमांसाठी पन्नास टक्के फि सवलत देणारी राजश्री शाहु महाराज शिष्यवृत्ती,परदेशात शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती,स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देण्यासाठी ,अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सारथीची स्थापना,बाहेरगावी शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यासाठी मोफत डाॕ.पंजाबराव देशमुख विद्यार्थी वस्तीगृह आणि आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पुनरूज्जीवन करून मराठा समाजाचे उद्योजक आणि उद्योगातून रोजगार निर्मिती करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी धोरण आखले.
त्यापैकी डाॕ.पंजाबराव देशमुख विद्यार्थी वस्तीगृह नाशिककरांना समर्पित करण्यासाठी आयोजीत छोटेखानी समारंभाला संबोधित करतांना ना.चंद्रकांत दादा पाटील यांनी उपसमितीने घेतलेल्या या विविध निर्णयांचा हवाला देऊन आरक्षणातून होणार्या संभाव्य फायद्यापेक्षा या समाजाला अधिक देण्याचा हा अल्प प्रयत्न हे सरकार करीत आहे.आरक्षण देणारच आहोत,माञ ते कायद्याच्या चौकटीत टिकायला हवे असा सरकारचा प्रामाणिक प्रयत्न असून मराठा समाजाला हेच सरकार आरक्षण देईल अशी ग्वाही समाजश्रोत्यांना दिली.
पालकमंञी ना.गिरीश महाजन आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनीही मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात,असा विश्वास देऊन समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सोबत असल्याचे स्पष्ट केले.प्रस्तावना करतांना करण गायकर यांनी उपसमितीने घेतलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त करतांना उपसमितीने आरक्षणाच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत करून आरक्षणाच्या प्रक्रीयेला वेग देण्याचे आवाहन केले.तुषार जगताप यांनी संचलित केलेल्या या सोहळ्याच्या विचारमंचावर प्रमुख मान्यवरांसह खा.हरिश्चंद्र चव्हाण,आ.देवयानी फरांदे,आ,सीमाताई हिरे, बाळासाहेब सानप, अनिल कदम, महापौर रंजना भानसी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके,सुनील बागूल,किशोर चव्हाण,विलास पांगारकर ,शिवाजी चुंबळे, उध्दव निमसे, लक्ष्मण सावजी , माणिकराव कोकाटे संभाजी मोरुस्कर,गणेश गीते,जगदीश पाटील, सुनीता पिंगळे, प्रमोद बोरसे, अमोल निकम, मेडिएटर फाऊंडेशन चे सदस्य आदी स्थानापन्न होते.हा छोटेखानी सोहळा यशस्वी करण्यासाठी करण गायकर ,तुषार जगताप,गणेश कदम,राजु देसले ,उमेश शिंदे ,अरुण पाटील ,नितीन सातपुते ,गौतम वाघ ,सोमनाथ पवार , योगिताताई आहेर, अस्मिता देशमाने,माधवी पाटील,प्रमिला चौरे, आण्णासाहेब खाडे ,पुंडलिक बोडके ,मनोरमा पाटील ,पूजा धुमाळ ,रोहिणी दळवी ,डाॕ.माधवी गायकवाड, तेजल वाघ, मदन गाडे ,सुनील शेरताटे , संतोष माळोदे , मधुकर कासार यांच्यासह शेकडो मावळ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.