पालिका आयुक्त हटाव” काँग्रेस आक्रमक  २२ अक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन 

पालिका आयुक्त हटाव” काँग्रेस आक्रमक
 २२ अक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन 
ठाणे ,  प्रतिनिधी  : ठाणे पालिका आयुक्त, पालिका सत्ताधारी आणि पालकमंत्री यांच्या अदृश्य युती, थीमपार्कवर झालेली टीका यामुळे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची कारकीर्द विकासाची आणि वादग्रस्त झाली आहे. तर पालिका आयुक्त यांची बदली कारण्याता यावी म्हणून ठाणे काँग्रेस अग्रेसर आहे. त्यांनी पालिका आयुक्त हटाव मोहीम सुरु केली आहे. २२ अक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सदस्याने एक दिवसीय धरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचे घोषित केले आहे. 
 
    महाराष्ट्र प्रदेशकाँग्रेस सदस्य मिलिंद खराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना एक दि  30 ऑगस्ट रोजी  आयुक्तांच्या बदलीसाठी पत्र  दिले होते. मात्र कुठलीच हालचाल करण्यात आलेली नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत मुख्यमंत्र्यांना आठवण करून देण्यात येणार असल्याचे खराडे यांनी सांगितले. पालिका आयुक्त हटाव मोहिमेतील एक कार्यक्रम हा २२ अक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करनयेत येणार असल्याचे ठाणे काँग्रेस उपाध्यक्ष रिफील हँफी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.