माओवादी संबंध नजर कैदेतील अरुण परेरा पुणे पोलिसांच्या ताब्यात 

माओवादी संबंध नजर कैदेतील अरुण परेरा पुणे पोलिसांच्या ताब्यात 
 
ठाणे : प्रतिनिधी 
 
माओवादीशी संबंध असल्या प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अरूण परेरा हे नजर कैदेत होते. नजर कैदेची मुदत शुक्रवारी संपल्याने पुणे पोलिसांनी ठाण्याच्या चरई मधील घरतून परेरा याना ताब्यात घेण्यात आले. पुणे पोलिसांनी तपासकामी परेरासह पुण्याला रवाना झाले.  
 
        माओवादी संबंध प्रकरणात पूर्वीही पोलिसांचा ससेमिरा लागलेल्या ठाण्यातील अरुण परेरा हे पुन्हा भिमा कोरेगाव प्रकरणा नंतर पुन्हा एकदा माओवादी संबंध असल्याच्या वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र न्यायालयाने  दिलासा दिल्याने अनेक महिने परेरा हे नजर कैदेत ठाण्याच्या त्यांच्या चरई परिसरातील घरात होते. शुक्रवारी नजर कैदेची मुदत संपल्यानंतर मात्र पुणे पोलीस शुक्रवारी सकाळीच ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी अरुण परेरा याला घेऊन नौपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया करून परेरासह पुण्याला रवाना  झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.