डांबर चलन घोटाळा : एन. एम पवारांच्य‍ा निलंबना साठी मुख्यमंत्र्यांना भेटणार – रणधीर

डांबर चलन घोटाळा : एन. एम पवारांच्य‍ा निलंबना साठी मुख्यमंत्र्यांना भेटणार – रणधीर

मुंबई : (प्रतिनिधि) सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात येऊन भा.दं.वी. ४२०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी दि. ३१/१०/२०१८ पासुन मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास सुरुवात झाली असुन आज उपोषणाचा ३रा दिवस असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्त्य‍ा आणि महाराष्ट्र आॅफिसर या वृत्तपत्राच्या संपादिका कु.सुनिता रणधिर यांनी दिली अाहे.


सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या डांबरच्या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या मूळ चलनांचा घोटाळा करून डांबर न वापरताच कामे पुर्ण केल्याचे कागदोपत्री दाखवुन त्या कामांची देयके अदा करून महाराष्ट्र शासनाच्या नियमांची पायमल्ली करणारे सर्व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा महा घोटाळा केला आहे .

या महाकाय घोटाळ्याला सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे चे तत्कालीन अधीक्षक अभियंता एन एम पवार (नाना पवार ) हे जबाबदार असुन त्यांनी सर्व कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने असंख्य देयकांना मूळ चलन न जोडता किंवा अवैध चलन जोडून देयके काढून घेण्याची अनुमती दिली असल्याचे जाणवत असल्याने त्यांना त्वरीत निलंबित करण्यात यावे या प्रमुख मागणी साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे उपोषणकर्त्या सुनीताताई रणधीर यांनी सांगितले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंडळ कार्यालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सर्व विभागीय कार्यालयातील देयके काढताना शासनाच्या परिपत्रकातील तरतुदींचा भंग करुन सा.बां.विभाग क्र २ चे तत्कालीन कार्यकारी अभियंता दिनेश यु महाजन यांचे सह सर्व संबंधित कार्यकारी अभियंता यांनी अनाधिकृतरित्या देयके काढुनघेऊन महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली आहे.सार्वजनिक बांधकाम मंडळ ठाणे या मंडळ कार्यालयाच्या अधिपत्याखाली एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असताना अधीक्षक अभियंता एन.एम पवार यांनी या भ्रष्टाचाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून सर्व भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालून संगनमताने मिळून सर्वांनी महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे .
महाराष्ट्र राज्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी एन.एम.पव‍ार य‍ांन‍ा पाठीशी घालत असुन या भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसह मुख्य सूत्रधार ठाणे सा.बां मडळ कार्यलयाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता एन.एम पवार यांना त्वरित निलंबित न केल्यास उपोषणासह आंदोलनाची व्याप्ती वाढविणार असल्याचे कु.सुनिताताई रणधीर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.