एक डबा आपुलकीच्या फराळाचा  कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे फराळाच्या डब्यांचे वाटप

एक डबा आपुलकीच्या फराळाचा
 कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना राष्ट्रीय बंजारा परिषदेतर्फे फराळाच्या डब्यांचे वाटप

ठाणे , ( मणीलाल डांगे ) :
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमात नेहमीच अग्रक्रमाने सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेने अनेक जनकल्याणार्थ कामे केली आहेत. सामाजिक कार्यात नावलौकिक मिळवल्यानंतर आता संघटनेने खाकी वर्दीतल्या कर्तव्य दक्ष पोलिसांच्या हितार्थ अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. याच उपक्रमांतर्गत संघटनेच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे धनतेसरच्या दिवशी पोलिसांना 100 फराळाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय राठोड, शहरअध्यक्ष देवराज राठोड, सामाजिक कार्यकर्ते गोर प्रकाश राठोड आदी उपस्थित होते. गोरधर्मपिठाचे संस्थापक तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसनराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

सामान्य नागरिकांना कोणताही सण, उत्सव, मिरवणूक, कार्यक्रम मोठ्या आनंदाने, जल्लोषात साजरा करता यावा म्हणून स्वतःच्या परिवाराला सोडून जनतेच्या आनंदासाठी दिवसरात्र, 24 तास 12 महिने तटस्थ तैनात राहून कोणतीही वाईट घटना घडू नये, सण उत्सव सुरळीत पार पडावे म्हणून खाकी वर्दीतला माणूस सदैव कार्यरत असतो. गुन्हेगार आणि पोलीस यापलीकडे पोलीस आपले मित्र आहेत, ही भावना व हा संदेश समाजातील लोकांना मिळावा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा संदेश पोहचावा म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने पुढाकार घेण्यात येतोय. ड्युटीवर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची कृतज्ञता व्यक्त करत संघटनेने एक आदर्श उभा केला आहे. बंजारा परिषदेच्यावतीने नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जन आणि नवरात्रीत पोलिसांना क्षणभर विश्रांती हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर आता दिवाळीत पोलिसांची दिवाळी गोड व्हावी म्हणून कर्तव्यावर हजर असलेल्या पोलिसांना फराळाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात 1100 फराळाच्या डब्यांचे वाटप धनतेरसच्या दिवशी करण्यात आले. या उपक्रमास सोमवारी सकाळी 9 वाजेपासून कासारवडवली पोलीस ठाण्या पासून सुरवात करण्यात आली. त्यानंतर ठाणे शहरातील 12 पोलीस ठाण्यात व ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात या फराळाच्या डब्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.