करण,तुषार,विनोद,अंकुश,संजीव…… समाजकारणाच्या खाणीत सापडलेले कोहीनूर !!!

करण,तुषार,विनोद,अंकुश,संजीव……
समाजकारणाच्या खाणीत सापडलेले कोहीनूर!!!

 

कुमार कडलग,नाशिक :
वय झालं म्हणजे मुरब्बीपणा येतो,बुध्दी मुत्सद्दी होते.वडिलधारी म्हणून अनेक पावसाळे खाल्ले या भांडवलावर गावकीचं नेतृत्व चालून येतं किंवा हिसकावून घेतलं जातं.आपल्या समाजकारणात आणि राजकारणात हीच शैली आजवर मुळ धरून होती.बुजुर्गांनी या शैलीचा तितक्याच मुत्सद्दीपणाने वापर करुन एका पिढीने समाजकारणात आणि त्यातून राजकारणात पक्के बस्तान बसविले.समाज आपला बटीक आहे ही धारणा पक्की करून समाजाला आपल्यासोबत दशकानूदशके फरफटत नेले.समाजकारणात आणि राजकारणातही नवा कुणी पदार्पण करणार नाही याची शक्य तितकी काळजी पिढीने घेतली.नवीन तरुण उमदे नेतृत्व तयार झाले नाही.झाले तरी ते टिकू दिले नाही.त्यातूनही जे उभे राहीले त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला किंवा बुजुर्गांच्या मर्जीतीलच नेतृत्व पुढे आले.
तथापी गेल्या दोन पाच वर्षात तरूण पिढीत जागृत झालेली नेतृत्व बंडाची भावना मुळ धरत असतांना समाजातून नवे नेतृत्व उभे राहण्याची प्रक्रिया वेग धारू लागली.विशेषतः चारशे वर्षानंतर संघटीत झालेला मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या झेंड्याखाली एकञ आला.आणि नवे तरूण नेतृत्वाची पोकळी भरून निघण्याची प्रक्रीया खर्या अर्थाने जोर धरू लागली.कोपर्डीतील त्या दुर्देवी घटनेने सम्पूर्ण मराठा समाज पेटून उठला.वर्षानुवर्ष दबलेल्या भावना आग ओतू लागल्या.समाजाचे प्रस्थापित नेतृत्व राजकारणासाठी लाचार बनल्यामुळे समाजावर ही वेळ आली.समाजातील तरूण बेरोजगारीने देशोधडीला लागला.मुलीबाळींची इज्जत लुटली जाऊ लागली.शेतात राबराबणारा बाप कर्ज वाढले म्हणून गळ्याला फास लावून झाडाला लटकू लागला.बापासह माता भगिनी आत्महत्या करू लागल्या.एकूणच मराठा समाज उध्वस्त होऊ लागल्याची जाणीव मराठा तरूणांना उद्विग्नतेकडून आक्रमतेकडे वळू लागला.आणि क्रांती मोर्चाचे नेतृत्व तरूणांच्या हातात येण्याचे संकेत मिळू लागले.क्रांती मोर्चा तरूणांच्या हातात जाऊ नये म्हणून पुन्हा एकदा बुजुर्गांची फळी गावगुंडी करू पहात होती.तथापी जागा झालेला समाज या गावगुंडीविरूध्द एकसंघ उभा ठाकल्याने बुजुर्गांसमोर पळ काढण्याशिवाय पर्याय उरला नाही.
कोणी नेता नाही,राजकीय नेत्यांना प्रवेश नाही या आचारसंहितेने नेतृत्वाची हौस भागवून आयत्या गर्दीवर नेतेगीरीच्या रेघोट्या ओढणारे नेतृत्वाच्या स्पर्धेतून खड्यासारखे बाजूला फेकले गेले आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी नवे तरूण उमदे नेतृत्व उदयाला आले.महाराष्ट्रात विनोद पवार(मुंबई) अंकुश कदम(नवी मुंबई )करण गायकर ,तुषार जगताप(नाशिक),संजीव भोर (अहमदनगर), इंद्रजीत निंबाळकर(ठाणे) ,तेजस पावस (पालघर) ,विनोद साबळे(रायगड) नरेंद्र पाटील(नंदूरबार), मनोज मोरे(धुळे) चिञे पाटील(पुणे),विजय काकडे (औरंगाबाद),नितीन पविञकार(अमरावती) ,बच्छाव(जळगाव),माऊली पवार (सोलापूर),संदीप पोळे(सातारा),संजय पाटील (सांगली),डाॕ.अभय पाटील (अकोला),नितीन शिंगाणे(बुलढाणा) यासारखे नव्या नेतृत्वाच्या हाती क्रांती मोर्चाची धुरा विश्व आदर्श निर्माण करण्यास सक्षम ठरली.लाखोंचे मोर्चे निघूनही समाजाचा सःय तसूभरही ढळला नाही.सामाजिक सलोखा बिघडला नाही.मराठा समाजाचे नेतृत्व करीत असतानाही सामाजिक समन्वय साधण्याची कसरत या तरूणांनी दाखविल्यानेच खर्या समाजाचे समन्वयक या कसोटीला पुरेपुर उतरले.
आज समाज आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झाला असतांना कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर येऊ देण्याचे श्रेय या समन्वयकांकडेच जाते.
एव्हढे सारे घडत असतांना शापाने दुभंगलेल्या या बलाढ्य समाजात राजकारणाचे मांडलिकत्व स्वीकारलेले काही सडके मेंदू आक्रस्ताळी भुमिका मांडून समाजाला बदनाम करण्याचा डाव खेळत आहेत.त्याला मात देण्यासाठी या समन्वयकांनी आपली सारी क्षमता पणाला लावून कुटकारस्थाने विफल ठरविली.विशेषतः करण गायकर ,तुषार जगताप या तरूणांनी महाराष्ट्रातील इतर समन्वयकांची मोट बांधून क्रांती मोर्चा भरकटणार नाही यासाठी घेतलेले परिश्रम वाखाणण्याजोगे आहेत.ही मोट तोडण्यासाठी काही कावळे अजूनही दबा धरून आहेत.बुजुर्गांच्या विशेष आशीर्वादाने प्रयत्नांची क्रूर चेष्टा करीत आहेत.माञ त्याला भीक घालतील एव्हढे हे समन्वयक कमकुवत नक्कीच नाहीत.
एकुणच समाजकारणाच्या खाणीत सापडले हे कोहीनूर समाजाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास पाञ आहेत असा विश्वास समाजातून व्यक्त होतांना दिसणे हीच त्यांच्या क्षमतेची पावती आहे.ही मंडळी केवळ मराठा समाजाचे नेतृत्व करू शकतात असे नाही तर तमाम बहूजनांना सोबत नेण्याची त्यांची धारणा प्रचलीत होऊ पाहणार्या दुहीच्या समाजकारणाला सणसणीत चपराक देऊ शकते.
अर्थात त्यासाठी तेव्हढी सजगता त्यांनी बाळगायला हवी.अनेक उणिवा आहेत.त्या दुर सारायला हव्यात.समाजाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवायचा असेल तर बुजुर्गांच्या वाटेने न जाण्याचे शिववचन पाळायला हवे.फोडा झोडाच्या राजकारणाचे संकेता समजून घ्यायला हवेत.तुर्तास इतकेच!