वणी हद्दीत ५६ लाखाचा गुटखा जप्तः पो.अधिक्षकांसह ग्रामिण गुन्हे शाखेची धडक कारवाई

वणी हद्दीत ५६ लाखाचा गुटखा जप्तः पो.अधिक्षकांसह ग्रामिण गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैध गुटख्या विरोधात मोठी कारवाई, लाखोंचा गुटखा जप्त

नाशिक प्रतिनिधी
वणी पोलीस ठाण्याच्या हद्यीत, नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेच्या पथकाने, वणी सापुतारा रस्त्यावर, करंजखेड फाटाच्या दरम्यान, सापळा रचुन सापुता-या कडुन वणीकडे येणारा आयशर कंपणीचा ट्रक (क्र.एम एच १४ ईएम ३४९७) अडवुन चैकशी केला असता त्यात सुमारे ४२ लाख रूपये किमतीचा अवैध गुटखा सापडला. हा ट्रक जप्त करून गुन्हे शाखेने वणी पोलीस ठाण्यात आणला असून त्यानंतर वणी पोलीसांकडून अन्न व औषधे प्रशानास या बाबत माहिती देण्यात आली आहे. याकारवाईत सुमारे ट्रक सह ५३ लाख रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद शिवलाल पाटील यांच्या तक्रारी वरून चालक उध्दव रामराव राठोड (वय 23रा. चिमेगांव,ता औराई,जि.बिदर) याला अटक करण्यात आली असून गाडी मालक निलेश रामराव महानवर (रा. भिरवड फाटा पिंपरी चिंचवड) यांच्या विरोधात अन्न सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात अला आहे.
याप्रकणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२६ रोजी वणी पोलीसांना करंजखेड फाटा येथे अवैध गुटखा घेवुन जाणा-या गाडी बद्यल गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसर ग्रामिण गुन्हे शाखेच्या पथकाने वणी सापुतारा रस्तयावर सापळा रचला होता. सायं साडेपाच वाजेच्या दरम्यान सापुता-या कडुन वणीच्या दिशेने येणारा आयशर ट्रक (एम एच १४ ई एम ३४९७) पथकाने अडवुन चालकास ताब्यात घेतले. चालकाकडे चौकशी केली असता त्यात गुटखा आढळून आला. यासंदर्भात वणी पोलीसांनी अन्न व औषधे प्रशासनाचे प्रमोद पाटील यांनी संपुर्ण कारवाईची माहिती दिली. प्रमोद पाटील यांनी जप्त केलेल्या मालाची तपासणी केली असता सत्तर गोण्यामध्ये पॅकींग केलले, आर. एम. डी. सुगंधी तंबाखु, मिराज सुगंधी तंबाखु, तुलसी रॉयलजाफरानी सुगंधी तंबाखु, रजनीगंधा पानमसाला, विमल पानमसाला, व्ही सुगंधी तंबाखु असा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखु असे ४२ लाख ०८ हजार ६०० रूपये किंमतीचे ३०,६०० पुडे व आयशर ट्रक असा एकुन ५३ लाख ०८ हजार ६०० रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
यावेळी आर. एम. डी, रजनीगंधा, विमल असा पान मसाला व त्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखुच्या पस्तीस गोण्यांची तपासणी करून पोलीसांनी गुन्हा दाखल करून संपुर्ण जप्त केलेला मुद्देमाल अन्न व औषधे प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे. याप्रकरणी चालकास अटक करण्यात आली असुन गाडी मालकाचा शोध सुरू आहे.
ही कारवाई, नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, सपोनि आशीष आडसुळ, पोहवा दिपक आहिरे, संजय गोसावी, पुंडलीक राउत, दिलीप घुले, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, पोना अमोल घुगे प्रविण सानप, पोकॉ वि’श्वनाथ काकड यांच्या पथकाने केली आहे.वणी पोलीस ठाण्याच्या हद्यीत मोठया प्रमाणात गुटखा विेक्री होते. तसेच याची चोरटया मार्गाने मोठया प्रमाणात अवैध गुटखा विक्री व वाहतुक होत असुन येत्या महिना भराच्या कालावधीत दोनदा नाशिक ग्रामिण गुन्हे शाखेने वणी पोलीस ठाण्याच्या हद्यीत कारवाई करीत आता ४२ लाख व मागच्या वेळी पाच लाखांचा गुटखा पकडला आहे. वणी पोलीस ठाण्याच्या हद्यीतील आतापर्यंत दोन मोठया कारवाया करण्यात आहेत. या बाबी वणी पोलीसांच्या निदर्शानास येत नाही का असा प्रश्न वणीकरांना पडला आहे. कारण नाशिकवरून येवुन गुन्हे शाखेचे पथक असे सापळे रचुन अवैध गुटखा पकडते. या बाबत वणी पोलीसांची निश्क्रीयता दिसुन येत आहे. शहरात मोठया प्रमाणात गुटखा विक्री होत असुन वणी पोलीस त्यांना पाठीशी घालत कारवाई करीत नसल्याने तिव्र नाराजी आहे.