नाशिक मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना.

नाशिक मराठा क्रांती
मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते मुंबईला रवाना.

नाशिक/प्रतिनाधी : नाशिक मराठा क्रांती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आझाद मैदान,मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या संदर्भातील महत्वाचा अहवाल दाखल होणार आहेत. त्यावर मराठा समाजाची नजर असून यावरून पुढील मराठा समाजाची आरक्षणाची दिशा ठरणार आहेत.
मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक मागास असल्याचा आयोगानी अहवाल राज्य शासनाकडे सादर करून आठवडा उलटून देखील राज्य शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही म्हणून मराठा आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. अखेर आजच्या दिवसाचा मुहूर्तावर अहवाल विधिमंडळात दाखल होणार असून मराठा समाजाला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहेत. मराठा क्रांती मोर्चाची महत्वाची मागणी पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा मराठा या आंदोलकर्ते यांना आहेत. जर अपेक्षा भंग झाल्यात तर मराठा समाज आक्रमक होईल पुन्हा मराठ्यांना फसवलं गेलं अशी भावना निर्माण होईल. या सर्व घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी नाशिक जिल्ह्यतील मराठा कार्यकर्ते राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगताप,गणेश कदम तसेच जिल्हा समन्वयक विलास जाधव ,शरद तुंगार, उमेश शिंदे, शिवाजी मोरे, बंटी भागवत,संतोष मालोडे, विवेक घडवजे,
सचिन पवार, निलेश मोरे,आप्पा गाडे, सूरज सोलनकी,ज्ञानेश्वर जाधव, अंकुश शिंदे, मदन गाडे, सुनील खरजुल,दत्ता हरले, आकाश जगताप, प्रशांत औटे, हेमंत मोरे आणि शेकडो संख्येने मराठा कार्यकर्त्यांनी मुंबईला धाव घेतली आहे.