नाशिकच्या शिवकन्येचा अटकेपार झेंडा दिल्लीस्थित मिस अँड मिसेस इंडियाचा ताज सायली आवारेच्या शिरावर

नाशिकच्या शिवकन्येचा अटकेपार झेंडा
दिल्लीस्थित मिस अँड मिसेस इंडियाचा ताज सायली आवारेच्या शिरावर

 

नाशिक/ कुमार कडलग
बालपण ,शालेय जीवन आणि महाविद्यालयीन शिक्षणासोबत मुल्यशिक्षणाची शिदोरी नाशिकच्या मातीतून सोबत घेत विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे येथे नृत्याभिनयाला आकार देणार्या सायली दत्ताञय आवारे या नाशिकच्या शिवकन्येने दिल्ली येथील एसएसआर इन्टरटेनमेंट द्वारा आयोजीत मिस एन मिसेस इंडिया २०१८-१९ या स्पर्धेत अग्रस्थान मिळवून नाशिककर गुणवंतांच्या मानाचा शिरपेच खोवला आहे.
सायली ही मुळची नाशिककर.पंचवटीच्या मातीत तिचे बालपण खुलले.मेरी सीडीओ विद्यालयात माध्यमिक शिक्षण पुर्ण करून केटीएचएम महाविद्यालयात बीकाॕम आणि एमबीएची पदवी प्राप्त केली.
कलागुण अंगभूतच असल्यामुळे कलेला आसक्त असलेले तिचे मन तिला स्वस्थ बसू देत नव्हते.नृत्य आणि अभिनय यात विशेष रूची असलेल्या सायलीने पुण्यात राहून आपली कला विकसीत केली.
अनेक छोटेमोठे एकपात्री नाटक, नृत्य स्पर्धांत सहभाग घेऊन अनेक पारितोषिक मिळवली. पुण्यासारख्या शहरात वास्तव्य असल्याने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याने तिचा आत्मविश्वास द्विगूणित झाला,याच आत्मविश्वासामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून नाव कमावण्याची उर्मी मनाला सतत प्रोत्साहीत करीत होती,त्यातूनच दिल्लीतील एसएसआर एन्टरटेनमेंटकृत मिस एन मिसेस इंडिया २०१८-१९ या स्पर्धेत तिने सहभाग नोंदविला.देशभरातून प्रत्येक राज्यातून आलेल्या अनेक स्पर्धकांशी सामना करीत सायलीने या स्पर्धेचा मुकूट मिळविला.

सायलीचे वडील दत्ताञय आवारे व्यावसायिक असून आई सामान्य गृहीणी आहेत. आई वडील आणि लग्नानंतर पतीने दिलेल्या प्रोत्साहनामुळे यशाची पायरी गाठणे सोपे गेले हे सायली विनम्रपणे सांगते.महाराष्ट्राचे प्रेमही भरभरून मिळाल्याने यश जवळ आले असे सांगणारी ही शिवकन्या
पुढे मराठी मालिका, चित्रपट यात काम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगते.मुळ नाशिककर असलेल्या या शिवकन्येचा हा प्रवास नाशिककरांचाही अभिमान ठरला आहे.