महामानवाच्या विचारांवर चालणारा छञपतींचा मावळाः आरोग्यदूत तुषार जगताप

महामानवाच्या विचारांवर चालणारा छञपतींचा मावळाः आरोग्यदूत तुषार जगताप

कुमार कडलग ,नाशिक
जन्माला आलेला प्रत्येकजण वर्षावर्षाने मोठा होत जातो.वाढत असतो.हे वाढणारे वय एका टप्याहून दुसर्या टप्याकडे झेपावणारा क्षण म्हणजे त्या व्यक्तीचा वाढदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा पारंपारिक आहे.आपला जन्मदिवस दरवर्षी वाढदिवस म्हणून साजरा करीत असताना या क्षणापर्यंत जगलेल्या प्रत्येक क्षणाचा ताळेबंद मांडून कर्तृत्वाचा जमाखर्च अंतरमनाला सादर करणे आणि त्याच्या अनुभवातून पुढील जीवनाची दिशा ठरवणे हा खरे तर वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश असतो किंबहूना असावा.
तथापी कलीयुगाच्या प्रभावाखाली दबलेले असंख्य आपण उद्देशापासून कोसो दूर भरकटत असून वाढदिवसाच्या पविञ क्षणांचा उत्सव बनविण्यासाठी धावपळ करीत आहोत.अनेक बिभत्स, ऐहिक सुखाकडे नेणारे कार्यक्रम वाजविले म्हणजे वाढदिवस जोरात झाला,प्रकाश दिव्यांचा झगमगाट,रोषणाई,मासांहाराचा खमंग आस्वाद सोबत सुरा तिर्थ जमलच तर बाजारू ललनांचा नृत्य सहवास ,रस्त्यावर भला मोठा शामियाना टाकून उत्सवमुर्तीच्या गुणांची मुक्तवदने मुक्ताफळे उधळणार्या कथित दादा नानांच्या शब्दांचा (अनेकदा उसण्या) भडीमार,कधीकधी तर रस्त्यावर मिळेल त्या पृष्ठाचा आधार घेऊन केक भल्यामोठ्या तलवारीने ,रामपुरीने अथवा तत्सम धारीने कापला गेला म्हणजे भाऊचा वाढदिवस लईच जोरात झाला असे म्हणण्याची नवी परंपरा झपाट्याने विकसीत झाली आहे.आपआपल्या कुवतीप्रमाणे हजार पासून लाखो रूपयांची उधळण करणार्या या उत्सवमुर्तीचे त्या दिवशी सांगीतले जाणारे गुण अनेकदा श्रोत्यांना सोडा प्रत्यक्ष उत्सवमुर्तीच्या अंतरमनालाही वेदना देणारे असतात.गुणअवगुणांची वर्गवारी या दिवशी करायची नसते याचे भान ठेवून स्तुतीसुमने उधळणे स्वाभाविक आहे.समाजातील असा एक वर्ग वाढदिवसाच्या मुळ उद्देशाला हरताळ फासत असला तरी आपलं आयुष्य हे समाजाचं देणं लागतं,आपण आज जिथे जसे आहोत त्यात समाजाचे योगदान आहे थोडक्यात आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक यशामागे समाजाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याग आहे त्याची जाणिव ठेवून मिळेल तेंव्हा मिळेल तशी परतफेड करण्याची बांधिलकी जपणारा एक मोठा वर्गही आहे.त्यांचेही वाढदिवस साजरे होतात,त्या प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या उद्देश बिंदूवर केवळ समाज आणि समाजच असतो.शर्यतीतील झापडं लावलेल्या घोड्यासारख म्हणा किंवा अर्जुनाला दिसणार्या पक्षाच्या डोळ्याप्रमाणे म्हणा समाजाचे कल्याण करणे हेच त्यांचे जीवन उद्दिष्ट असते.अशा व्यक्तीमत्वांचे वाढदिवसही वरकरणी साधेपणाने साजरे होतांना दिसत असले तरी त्यातून समाज चेहर्यावर उमलणारे समाधान कुठल्याही रोषणाईपेक्षा उत्सवाचा हर्ष उजळण्यास कारणीभूत ठरते.या हर्षाचा दणदणाट डिजेच्या आदळआपटीपेक्षा हृदय स्पंदनाला नादमधूर करून जातो.अशा प्रकारची व्यक्तीमत्वे या दिवशी आजवर जगलेल्या प्रत्येक क्षणाचा जमाखर्च मांडून समाजाच्या वाट्याला काय दिले ,काय द्यायचे राहीले याचा वेध घेऊन आयुष्याचे अंदाजपञक तयार करीत असतात.आणि त्या कर्तृत्व अंदाजपञकाप्रमाणे जीवनमार्गक्रमण सुरू असते,
याच कार्यकुळातील डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा छञपतींचा मावळा ,नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रात जलसंपदा मंञी गिरीश महाजन यांच्या आरोग्यसेवेला समाजाभिमूख बनविण्यासाठी सेवारत असलेला आरोग्यदूत तुषार जगताप यांचाही वाढदिवस (१० डिसेंबर ) साजरा होतोय.डिसेंबर महिन्यात अनेक महानुभवांचे जन्मदिवस आहेत.शुभेच्छा देण्यासाठी भक्त अनुययांमध्ये हजारो रूपये खर्च करून फलकबाजीची स्पर्धा सुरू आहे.इतरांप्रमाणेच तुषारवर प्रेम करणार्या चाहत्यांनीही गेल्या दोन तीन दिवसांपासून या फलकबाजीच्या स्पर्धेत उडी घेतल्याचे शहरात लागलेल्या फ्लेक्सनी निदर्शनास आणून दिल्यानंतर समाजाच्या दुःखांनी सतत व्यथीत असलेल्या तुषारच्या संवेदनशील मनाला वेदना होणे स्वाभाविक आहे.या वेदनांनी अस्वस्थ झालेल्या तुषारने आपल्या सर्व चाहत्यांना बॕनरबाजी न करण्याचे आर्जव करीत वाढदिवसानिमित्त व्यक्तशहोणारे हे प्रेम समाजातील गरजू रूग्णांच्या सेवेला अर्पण करण्याची साद घातली.
आज समाजाला खरेतर अशा प्रकारच्या जन्मदिन उत्सवाची गरज आहे.अशा उत्सवमुर्तींना शुभेच्छा देण्याचा मोह रस्त्यावरून जाणार्या अनोळखींनाही टाळणे केवळ अशक्य आहे.

“आजपर्यंत प्रत्येक वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला .मागच्या वर्षापर्यंत आपल्यासारखीच मलाही वाढदिलसाची नशा होती.माञ आपल्या अवतीभोवती शेकडो हजारो रूग्ण पैसे नाहीत म्हणून योग्य वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने दुर्धर आजाराच्या खाईत अडकले आहेत.अनेकांचा जीव गेला आहे.अनेकांना मरण येत नाही म्हणून जीवंतपणीच मरण अनुभवत आहेत.वाढदिवसाच्या नशेतून बाहेर आल्यानंतर या जळजळीत वास्तवाची आग मनाला बेचिराख करून गेली.तेंव्हापासून रंजल्या गांजल्या हतबल असहाय्य रूग्णांना वैद्यकीय उपचार मिळावेत म्हणून जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंञी गिरीश महाजन यांच्या रूग्ण सुश्रूषा कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा संकल्प सोडला.हा संकल्प सिध्दीस जाण्यासाठी मला आपल्यासारख्या हजारो हातांची गरज आहे,या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा कॕन्सरग्रस्त रूग्ण दत्तक घेऊन त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च करण्याचे निश्चित केले आहे.मी आणि माझा वाढदिवस केवळ निमित्त आहे.हे शिवधनुष्य उचलण्याची उर्मी देणारे आपण आहात,माझ्यावर असलेले आपले प्रेम आहे.त्याच विश्वासाधिकाराने आपण या आरोग्यकार्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहे. वाढदिवसानिमित्त होणारी फलकबाजी टाळून,अन्य फालतू खर्च टाळून होणारी बचत रूग्णसेवेला अर्पण करा.आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त हा संकल्प पुर्णत्वास नेला तर नजिकच्या भविष्यात आरोग्यमय भारत ही बिरूदावली मिरवण्याचा अभिमान आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला येईल,एव्हढीच या वाढदिवसानिमित्त मागणी आहे,याच शुभेच्छा माझ्यासाठी मोलाच्या आहेत.”-
– तुषार जगताप
आरोग्यदूत