दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेस यश !!!

दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेस यश !!!
तब्बल 25 दुचाक्या जप्त !!!

उल्हासनगर, प्रतिनिधी : कल्याण अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर हद्दीत दुचाकींच्या चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली होती त्यामुळे उल्हासनगर गुन्हे शाखेने समांतरपणे तपास करत दुचाकी चोरणाऱ्या या टोळीला सापळा रचत जेरबंद केले आहे. धनंजय कुमावत (19) आणि 3 अल्पवयीन दुचाकी चोरट्यांचा यात समावेश आहे. पोलिसांनी त्यांना उल्हासनगरमधून अटक केली आहे.

या चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे अत्यंत मोठे आव्हान होते. गुन्हे शाखेचे पोलीस नाईक जगदीश कुलकर्णी ( तात्या ) यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकाने उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 3 येथील इंदिरा गांधी चौक परिसरात सापळा रचला. त्यावेळी आरोपी धनंजय कैलास कुमावत 3 अल्पवयीन चोरट्यांसोबत दुचाकी चोरण्यासाठी आला होता. त्याच सुमाराला या 4 जणांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता, त्याने चोरलेली   (एम. एच. 05 सी. जे. 1282)  ऐकटिव्हा मिळून आली. ही दुचाकी उल्हासनगर कॅम्प 3 सपना गार्डनसमोर येथून चोरी केल्याची कबुली अटक आरोपींनी दिली.

उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना सांगितले की आरोपी धनंजय कुमावत व इतर 3 अल्पवयीन चोरटे बनावट चावी वापरून दुचाकी लंपास करत होते. या टोळीने उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण या परिसरातील विविध ठिकाणांवरून चोरलेल्या 6 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 25 दुचाकी या टोळीकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 15 अॅक्टिवा स्कूटर आणि 10 इतर दुचाकी आहेत. अशाप्रकारे उल्हासनगर आणि कल्याण परीमंडळातील विविध पोलीस ठाण्यात एकुण 21 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही कारवाई करणाऱ्या पथकात साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, साहाय्यक पोलीस निरिक्षक युवराज सालगुडे, साहाय्यक पोलीस निरिक्षक श्रीकृष्ण नावले, पोलीस उप निरिक्षक गणेश तोरगल, उदयकुमार पालांडे, वसंत पाटील, रमजु सौदागर, किशोर महाशब्दे, संजय माळी, पोहवा प्रशांत तावडे, भरत नवले, सुनिल जाधव , रामदास मिसाळ तसेच पोना.जगदीश कुलकर्णी यांचा सहभाग होता.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी जनतेला आव्हान केले आहे की लोकांनी आपले वाहन असेच कुठेही न लावता योग्य जागी म्हणजे पे एंड पार्क मध्ये सुरक्षित ठिकाणी पार्क करावे तसेच पालकांनी आपले अल्पवयीन किंवा तरुण मुले कोणाशी मैत्री करतात तसेच रात्री नवनवीन गाड्या घेऊन तर येत नाहीत ना यावर बारीक लक्ष ठेवावे .