कळवा  रुग्णालयाच्या सफाई कर्मचाऱ्याचा प्रताप…… देखरेख करणारच ठरला भक्षक 

कळवा  रुग्णालयाच्या सफाई कर्मचाऱ्याचा प्रताप…… देखरेख करणारच ठरला भक्षक 

 अतिदक्षता विभागातील  रुग्ण महिलेच्या 
सतर्कतेने वाचली अल्पवयीन मुलीची इभ्रत 
 
 घृणास्पद प्रकार पाहून रुग्ण महिलेने केली आरडाओरड 
कळवा : प्रतिनिधी  
महिलांच्या सुरक्षेच्या जेवढ्या दक्षता आणि संरक्षणासाठी कायदे केले गेले असले तरीही स्त्री जात सुरक्षित नसल्याचे चित्र कळवा  रुग्णालयातील घटनेने स्पष्ट होत आहे. कळवा छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल अल्पवयीन  १५ वर्षाची मुलगी उध्वस्त होण्यापासून बचावली. याच कक्षात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्ण महिलेच्या सतर्कतेने तरुणी वाचली. अन्यथा कळवा  रुग्णालयात पुन्हा एकदा कलंकित घटना घडली असती. कळवा  पोलिसांनी नराधम भक्षक दिनेश कोळी याला अटक केली. असून न्यायालयाने त्याला १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी ठोठावल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक तुकाराम पावले यांनी दिली. 
 
             अटक नराधम आरोपी दिनेश कोळी (३५) रा. कोळीवाडा ठाणे हा कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करीत होता. कळवा रुग्णालयात अतिदक्षता विभागात १५ वर्षीय मुलगी उपचार घेत होती. कळवा  रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात २० बेड होते. सर्वांच्या सर्व बेड रुग्णांनी भरले होते. तर अतिदक्षता विभागाच्या अखेरच्या टोकाला  १९ व्या बेडवर हि मुलगी उपचार घेत होती. शनिवारी मध्यरात्री १२-३० वाजण्याच्या सुमारास आरोपी दिनेश कोळी हा अतिदक्षता विभागात आला. त्याने १९ व्या बेडवर असलेल्या मुलीचे हातपाय बांधले. आणि तिच्या शरीराशी चाले करू लागला. सर्वच रुग्ण हे अत्यावस्थ असल्याने आराम करीत होते तर काही निद्रस्थ होते. मुलगीही अत्यवस्थ निपचित पडली होती. त्यामुळे कुठलीही हालचाल झाली नाही. नराधम हा आपले कुकर्म करण्यापूर्वीच बेडवर असलेली  रुग्णमहिला  खातून हिने हा प्रकार पहिला आणि संतप्त होत म्हणाली,” ए भडव्या काय करतोस”, म्हणून शिवीगाळी केली. त्यावर हा नराधम कोळी महिलेला म्हणाला “ए तुझं काम तू कर, थोबाड तिकडे कर” असे उर्मट उत्तर देत आपला कार्यभाग उरकण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसताच रुग्ण महिला खातून हिने आरडाओरड केली. अतिदक्षता विभागातुन ओरडण्याचा आवाज आल्यानंतर रुग्णालयातील अन्य कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक आले आणि त्यांनी नराधमाला पकडले आणि कळवा पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
              घडलेल्या घटनेबाबत कळवा पोलीस ठाण्यात आरोपी नराधम दिनेश कोळी विरोधात भादंवि ३७६ आणि बाल  लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ अन्वये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयात नेल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर मंगळवारी न्यायालयाने आरोपी दिनेश कोळी याला १५ दिवसाची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुकाराम पावले यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास  कळवा पोलीस ठाण्याचे पो. नि. पावले करीत आहेत.