मुंब्रा परिसरातील अफीफा चाळ खचली-57 घरे केले खाली 

मुंब्रा परिसरातील अफीफा चाळ खचली-57 घरे केले खाली 

मुंब्रा : प्रतिनिधी  
मुंब्र्यात धूम कंपाउंड परिसरात असलेली तळ अधिक दोन माळ्याची चाळ खचल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी स्थानिक रहिवाशी आणि पालिका अधिकारी यांनी अफीफा चाळीतील तब्बल 57 घरे खाली करण्यास सांगितल्याची  माहिती स्थानिकांनी दिली.
           
मुंब्रा धूम कंपाउंड परिसरात असलेली अफीफा चाळ याच्या ए,बी आणि सी अशा विंग आहेत. 20 वर्षांपूर्वी तयार करण्यात  आलेली ही चाळ तळ  अधिक दोन मजल्याची असून शुक्रवारी ती खचल्याने एकच खळबळ उडाली या चाळीत तब्बळ 57 कुटुंब राहतात. चाळीचा पुढचा भाग खचल्याने लाकडाच्या टेकूने त्याला सावरण्याचा प्रयत्न करण्यात आले. मात्र प्रथम दर्शनी असलेल्या रूमधील रहिवाशांना त्वरित खोल्या खाली करण्याचे आदेश देण्यात आले. तूर्तास या नागरिकांना आपल्या नातेवाईकांच्या घरी आश्रय घेण्याचे सांगण्यात आले आहे. तर चाळीतील इतर लोकांना मात्र घरातील अवजड सामान काढून तूर्तास राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानंतर या चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकारी आणि स्थानिकांनी दिली. अफीफा चाळीत तळ  मजल्यावर 18 खोल्या आहेत. पहिल्या माळ्यावर 20 खोल्या आहेत. तर दुसऱ्या माळ्यावर 19 खोल्या असल्याची माहिती असून घटनास्थळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते. सादर चालीचा बिल्डर सईदभाई याने 20 वर्ष मेंटेनन्सचे पैसे घेतले. तर चाळ  दुरुस्तीसाठी काही लोकांकडून पैसेही घेऊन दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याची एकच चर्चा मुंब्रा परिसरात सुरु आहे. दरम्यान या चाळीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करण्याच्या परिस्थितीत चाळ आहे कि नाही हे तपासून नंतर दुरुस्ती किंवा रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात  येणार आहे अशी माहिती उपलब्ध आहे.