समाजकंटाकांचा नवा फंडा-कारवर अज्ञाताने टाकले ऐसीड 

समाजकंटाकांचा नवा फंडा-कारवर अज्ञाताने टाकले ऐसीड

अज्ञातांवर गुन्हा दाखल 
ठाणे : प्रतिनिधी 
पूर्ववैमनस्येतून दुचाकी पार्किंग केलेली वाहने पेटवून देण्याचा फंडा समाजकंटकांनी वापरून ठाण्यात एकच खळबळ उडवून दिली होती. ठाण्यात अशाप्रकारे दुचाकी वाहन जळीतकांडाच्या तब्बल 10 घटना ठाण्यात वर्षभरात घडल्या. ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरात नुकतीच 18 गाड्या जाळण्याची घटना घडली हि ताजी असतानाच स्टेशन परिसरात अज्ञाताने एक कारवार ऐसीड  टाकून कारचे नुकसान केल्याची घटना शुक्रवारी समोर आली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. 
 
           ठाण्यात सध्या भांडणाचा राग काढण्याचा किंवा दुश्मनी काढण्याचा प्रकार वाढीस लागल्याने पोलिसांच्या डोक्याला ताप  ठरला आहे. ठाण्यात तब्बल 10 दुचाकी वाहन चोरीच्या घटनांनी कहर केल्यानंतर शुक्रवारी टाटा झेस्ट या कारवर अज्ञाताने ऐसीड टाकल्याची घटना समोर आल्याने पुन्हा एकदा ठाण्यात खळबळ उडाली आहे. टाटा झेस्ट मालक मनोज तीर्थराज दुबे यांची गाडी क्र एमएच 04 एचवाय 4752 हि सफेद रंगाची कार  स्टेशन परिसरातील दुबे कंपाउंड परिसरात पार्किंग केली होती. रात्री अज्ञाताने नकळत कारवर ऐसीड  टाकून गाडीचे नुकसान केले. या प्रकरणी गाडीचे चालक दुबे यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर अदखलपात्र  गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. ठाणे नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. सादर प्रकार हा दुश्मनी काढण्याचा असल्याचा प्राथमिक अंदाज दिसत आहे. वाहन जळीतकांडानंतर आता या ऐसीड हल्ला करण्यात आल्याने आता पार्किंग केलेली वाहने ही असुरक्षित असल्याचे चित्र आहे.