कल्याण-डोंबिवलीकरांच्या सदृढ आरोग्यासाठी एसआरव्ही ममता रूग्णालयाने घेतली प्रतिज्ञा

कल्याण-डोंबिवलीकरांच्या सदृढ आरोग्यासाठी एसआरव्ही ममता रूग्णालयाने घेतली प्रतिज्ञा
वृध्दस्री-पुरूषासह ….नागरीकांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली.

 

डोबिंवली , प्रतिनिधी – एसआरव्ही ममता रूग्णालय व आमदार श्री.नरेंद्र पवार यांच्या सहयोगाने सामाजिक बांधिलकी जपत सदृढ समाज व परिसर असावे म्हणून  आंबिवली परिसरातील नेपच्युन स्वराज्य याठिकाणी नागरीकांसाठी  आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते . हे आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी श्री. अनिता पाटील, श्री.विवेक जाधव, श्री.संजय चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

या आरोग्य शिबिरात 200  हून व्यक्तींनी सहभाग घेतला आणि त्यांनी विविध तपासण्या करून घेतल्या. त्याचप्रमाणे हृदयाचे आरोग्य, फुफ्फुसांचे विकार, हाडांचे आरोग्य आणि इतर वैद्यकीय इमर्जन्सींबद्दल एसआरव्ही ममता हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला आणि समुपदेशन केले.

 

रक्तशर्करा, रक्तदाब, ईसीजी, बीएमडी (बोन मॅरो डेन्सिटी चाचणी) आणि पीएफटी (पल्मोनरी फंक्शन टेस्ट) या मूलभूत चाचण्या या आरोग्य शिबिरात करण्यात आल्या. या चाचण्यांच्या आधारे भविष्यात काही जीवनशैलीशी निगडीत आजार होण्याची शक्यता आहे का ते तपासण्यात आले.

एसआरव्ही ममता हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. अभय विस्पुते म्हणतात, “ केवळ आजार नसणे म्हणजे सुदृढ आरोग्य नव्हे. चांगले आरोग्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा गटाला आजारांपासून मिळालेले स्वातंत्र्य आणि आपल्या पूर्ण कार्यक्षमतांचा उपयोग करण्यास सक्षम असणे. एखाद्या व्यक्तीच्या सुखवस्तू अस्तित्वासाठी आवश्यक घटक म्हणजे सुदृढ आरोग्य होय. आरोग्यसेवेमध्ये वैद्यकीय सेवेप्रमाणेच प्रतिबंधात्मक काळजीचाही समावेश होतो.”

 

“यू. पी. राव आणि ममता हॉस्पिटलचा समाजसेवा आणि वैयक्तिक पातळीवरील रुग्णसेवेचा वारसा पुढे नेत एसआरव्ही हॉस्पिटलने नेहमीच ‘हॉस्पिटल वुइथ अ हार्ट’व्हायचा प्रयत्न केला आहे. समाजातील प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. म्हणूनच, बहुधा फार उशीर होईपर्यंत दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या ‘आरोग्य’ या पैलूबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विविध संस्थांशी सहयोग करण्याचा आमचा प्रयत्न असतो.”अशी पुष्टी डॉ. विस्पुते यांनी जोडली.