मलेशियात “शब्द”चे चौथे मराठी विश्व साहित्य संमेलन अध्यक्षपदी संजय आवटे तर उद्घाटक पदी देवेंद्र भुजबळ

मलेशियात “शब्द”चे चौथे मराठी विश्व साहित्य संमेलन
अध्यक्षपदी संजय आवटे तर उद्घाटक पदी देवेंद्र भुजबळ

शब्द परिवाराचे चौथे मराठी विश्व साहित्य संमेलन मलेशियात क्वालालांपुर येथे ११ते १५ जानेवारी २०१९ दरम्यान होत आहे, अशी माहिती या सम्मेलनाचे संयोजक संजय सिंगलवार व प्रभाकर वानखेडे यांनी दिली. या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात लेखक, संपादक संजय आवटे यांची तर उद्घाटक म्हणून निवृत्त माहिती संचालक, लेखक देवेंद्र भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. या सम्मेलनात “प्राध्यापकांचे विश्व” , “यंगीस्तान : नव्या पिढीची भाषा ” हे परिसंवाद, २ कवी सम्मेलन,गझल मुशायरा, सांस्कृतिक कार्यक्रम सम्पन्न होतील. या सम्मेलनात महाराष्ट्र्रातुन कवी, लेखक, साहित्यप्रेमी मिळून जवळपास १२५ जण सहभागी होत आहेत. तर काही जण विदेशातून देखील सहभागी होत आहेत. नवोदित, प्रस्थापित अशा सर्वांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी “शब्द परिवार “गेल्या १० वर्षापासून विविध उपक्रम राबवित आहे.आतापर्यंत ४ राज्यस्तरीय,३ विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वीही विश्व साहित्य संमेलने थायलंड , दुबई, इंडोनेशियात झाली आहेत. विशेष म्हणजे शासनाचे कुठलेही अनुदान न घेता सर्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.