महामानवाच्या 128 व्या जयंती निमित्ताने बुंदी व लाडू वाटप

महामानवाच्या 128 व्या जयंती निमित्ताने बुंदी व लाडू वाटप

उल्हासनगर -: भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंती निमित्ताने बुंदी लाडू प्रसादाचे वाटप करण्यात आले . उल्हासनगर रेल्वे स्टेशन पूर्व देवानंद शिरसाठ यांचे रेल्वे तिकीट बुकिंग कार्यालया समोर दिनांक 14/4/2019 रोजी दुपार च्या सुमारास तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून विधिवत भंते जी चे हस्ते सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .या प्रसंगी नगरसेवक शेखर यादव ,माजी बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी सतीश डोंगरे , जेष्ठ पत्रकार व कोकण प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के , दिनेश गोगी , सुबोध गोंडाणे , बबन मनवर , सुरेश जगताप , सलीम मन्सुरी , श्याम गांगुर्डे उपस्थित होते . सदर कार्यक्रमाचे आयोजन रेल्वे तिकिट बुकिंग चे संचालक आयु. देवानंद शिरसाठ यांनी केले होते.