मुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठी समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे

मुंबई,पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास करण्यासाठी
समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी निवडणूक द्या- प्रेरणा बलकवडे

 

नाशिक, प्रतिनिधी :- मुंबई, पुण्याच्या धर्तीवर नाशिकचा विकास आणि प्रगती साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी केले आहे. तसेच देवळाली भगूर येथून समीर भुजबळ यांना मोठी आघाडी मिळवून देऊ असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, नाशिकच्या विकासासाठी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. जर्मन टेक्नोलॉजी असलेल्या फ्युनिक्युलर ट्रॉली ही देशात प्रथमच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडावर बसविली, गंगापूर गावानजीक बचतगटाच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवुन देण्यासाठी दिल्ली हाट च्या धर्तीवर कलाग्राम उभारले. मात्र युतीच्या खासदाराने केवळ भुजबळांचे नाव मोठे होईल म्हणून त्यांनी उद्घाटन देखिलकेले नाही अशा या नाकर्त्या लोकप्रतिनिधीला नाशिककर घराचा रस्ता दाखविल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदींवर थेट टिका करतांना बलकवडे म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला उज्ज्वला गॅसच्या योजनेबाबत महिलांची फसवणूक केली आहे कळवण तालुक्यातील फुलाबाई यांना उज्ज्वला गॅसच्या मोफत योजेनेबाबत त्यांना टिव्हीवर येत असलेल्या जाहीरातीत त्यांची भुमिका आहे. मात्र वस्तूस्थीती काही वेगळीच असल्याचे फुलाबाई सांगतात. मोफत उज्ज्वल गॅस योजना सांगुन गोरगरीबांची फसवणुक होत आहे उज्ज्वला गॅस शेगडी पोटी आमच्याकडून दोन ते तीन हजार रुपये वसुल केले आहे अशा फसव्या सरकारने संपूर्ण देशाची वाट लावली जातीपाती मध्ये वाद निर्माण करुन, राम मंदीर याबाबत तरुणांचे माथे भडकविण्याचे काम हे सरकार करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, आज देशात महिला सुरक्षित नाही बहुसंख्य ठिकाणी महिला व तरुणांवर अत्याचार होत आहेत. या घटनेतील आरोपी अजुन मोकाट फिरत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बलात्कार घटना फास्टट्रँक कोर्टात दाखल करुन दोषींवर फाशीची शिक्षा दिली जाईल असे जाहीर केले होते. केवळ फसव्या घोषणा करुन जनतेची दिशाभूल करत असल्याचे सांगत येत्या निवडणुकीत समीर भुजबळ यांच्यापाठीशी नाशिककर ठामपणे उभे राहतील असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.