कुणबी समाजाचे डॅशिंग एकमेव नेतृत्व आमदार किसनराव कथोरे यांना झेड सुरक्षा देण्याची मुरबाड विकासमंचाच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई शेलार यांची केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडे मागणी

कुणबी समाजाचे डॅशिंग एकमेव नेतृत्व आमदार किसनराव कथोरे यांना झेड सुरक्षा देण्याची मुरबाड विकासमंचाच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई शेलार यांची केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडे मागणी

मुरबाड , ( शरद घुडे ) : महाराष्ट्राच्या ठाणे जिल्हयातील मुरबाड विधानसभा मतदार संघातील आमदार किसन कथोरे हे लोकाभिमुख नेतृत्व आहेत.सामान्य गोर गरीब आदिवासी दलितांचे,बहुजनांचे कैवारी म्हणुन त्यांना ठाणे जिल्हयात मानले जाते.त्यांच्या वाहनाला एका ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला आहे.सदर घटनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आमदार किसन कथोरे हे ठाणे जिल्हयाची राजकीय ताकद असल्याने ठाणे जिल्हयाची सत्ता,समिकरणे बदलली आहेत तसेच प्रशासकीय गैरकारभार करणारे अधिकारी,गांवगुंन्ड, अवैध धंदेवाले यांचे धंदे बंद करून गुन्हेगारी दारूबंदीला लगाम घातल्याने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांपासुन तसेच राजकीय हेवेदावेतुन आमदार किसन कथोरे यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो असे ता.08/05/2019 रोजी झालेल्या अपघातावरून संशय निर्माण होत आहे.

नुकत्याच पारपडलेल्या कल्याण,भिवंडी,पालघर,ठाणे लोकसभेच्या निवडणुका त्यामध्ये आमदार किसन कथोरे यांनी वाढवलेले सेना-भाजपाचे मताधिक्य तसेच पुढील विधानसभा मधील निवडणुका यांच गांभिर्य लक्षात घेवुन व मुरबाड मतदारसंघ,अंबरनाथ,कल्याण,भिवंडी,ठाणे या मतदार संघातील गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यास आमदार किसन कथोरे यांचा सिहांचावाटा आहे.त्यातुन त्यांच्या जिवीताला धोका निर्माण होऊ शकतो याकडे लक्ष वेधुन महाराष्ट्रातील तसेच कोकणातील कुणबी समाजाचे डॅशिंग एकमेव नेतृत्व असल्याने त्यांना झेड सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी मुरबाड विकासमंच संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सौ.ज्योतीताई नामदेव शेलार,महिलाध्यक्षा ठाणे जिल्हाध्यक्षा दिपाली दळवी,सामाजिक कार्यकर्त्या मंजू थोरात,व अन्य महिलांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.विकासाचे वादळ म्हणून त्यांचे कार्य बेभान असताना आम लोकांसाठी ज्याचे दार सदैव उघडे असतात अशा व्यक्ती आदर्श आमदाराच्या गाडीला धडक ही पहिलीच आणि संशयजणक घटना असल्याचे बोलले जात आहे.हा अपघात चुकून झाला होता कि घडविण्यात आला होता,त्यामागे कोणाचा कारस्थानी हात आहे याचा शोध घेऊन सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे़.