दहावीच्या मुलांनी केले मातृ दिनी वृक्षारोपण !!!

दहावीच्या मुलांनी केले मातृ दिनी वृक्षारोपण !!!

उल्हासनगर , ( सलीम मंसूरी ) : १२ मे रोजी मातृ दिनाचे औचित्य साधून सैक्रेड हार्ट स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला.प्रदूषण , ग्लोबल वार्मिंग , वृक्षतोड मुळे जमिनीला वेदना सहन कराव्या लागत आहे .शुद्ध पर्यावरणाला आपली जबाबदारी म्हणून सैक्रेड हार्ट शाळेचे १० वी च्या मुलांनी  सुभाष नगर फस्ट गेट च्या जवळ के बी रोड फालवर लाईन उल्हासनगर -३ येथे रोडच्या मधोमध डिवाईडर च्या मध्ये वृक्षारोपण चा कार्यक्रम केला.यावेळी पर्यावरण मित्र चंदन तीलोकानी , निखील गोळे , प्रदीप दुर्गीया व अन्य मित्र यांनी जमा होऊन वृक्षारोपण करणार्या मुलांचे मनोबल वाढवले .