त्या पाच सुरक्षा रक्षकांना परत कामावर घ्या अन्यथा मनसे करणार आंदोलन !!!

त्या पाच सुरक्षा रक्षकांना परत कामावर घ्या अन्यथा मनसे करणार आंदोलन !!!

उल्हासनगर , ( सलीम मंसूरी ) : उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी व मनसेचे योगीराज देखमुख यांच्यात झालेल्या बाचाबाची व धक्काबुक्की च्या प्रकारात बघ्याची भुमिका घेतल्याचा ठपका ठेवत महापालिकेच्या पाच सुरक्षा रक्षकाना आयुक्त अच्युत हांगे यानी निलंबित केले आहे . त्यामुळे मनसे पुन्हा आक्रमक झाली असुन त्या पाचही सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या अन्यथा मनसे आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष बंडु देशमुख आणि मनसे युनियन अध्यक्ष दिलीप थोरात यानी दिला आहे .

उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यानी अनधिकृत बांधकामे तोडल्या मुळे मनसेचे योगीराज देखमुख व अन्य पदाधिकाऱ्यानी गणेश शिंपी यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली . तेव्हा महापालिकेचे बाजीराव जाधव , ज्ञानेश्वर पवार , रमेश पवार , शांताराम दिघे , विनोद झोनवाल  व दिनेश रिसवाल  हे सुरक्षा रक्षक उपस्थित होते , मात्र त्यांनी बघ्याची भुमिका घेतली म्हणुन त्यांना प्रथम नोटीस बजावुन खुलासा मांगितला होता . दरम्यान त्यानी दिलेला खुलासा समाधान कारक नसल्याचा अहवाला जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यानी आयुक्त अच्युत हांगे याना दिला . तेव्हा या अहवालावरुन आयुक्त हांगे यानी त्या पाच ही सुरक्षा रक्षकाना निलंबित केले आहे . परंतु या प्रकाराने मनसे आक्रमक झाली आहे . मनसे चे शहर अध्यक्ष बंडु देशमुख , मनसे युनियन चे अध्यक्ष दिलीप थोरात यांनी त्या पाचही सुरक्षा रक्षकांना कामावर घेन्याची मागणी केली आहे . अन्यथा मनसे स्टाईल ने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .