बेधडक

अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई बाबत विशेष कार्यकारी अधिकार्यांची भुमिका संशयास्पद. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा…..शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचा आरोप 

अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई बाबत विशेष कार्यकारी अधिकार्यांची भुमिका संशयास्पद. मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा…..शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचा आरोप 

उल्हासनगर(गौतम वाघ) : उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करून कल्याण – अंबरनाथ रस्त्यालगतची अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई सुरू केली होती मात्र गेल्या काही दिवसांत ही कारवाई  संशयास्पद रित्या गुंडाळली गेली आहे . या कारवाईत आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली असून या संपूर्ण प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्य सचिव आणि नागरी विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या कडे केली आहे. 

उल्हासनगर मनपा आयुक्त राजेंद्र निंबाळकर, विशेष कार्यकारी अधिकारी युवराज भदाणे, चारही प्रभागांचे सहाय्यक आयुक्त आणि अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात कल्याण – अंबरनाथ रस्त्यालगत असलेली काही बांधकामे जमीनदोस्त केली होती . या कारवाईचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले होते . मात्र या कारवाईचा विरोध काही राजकिय पक्षांनी व महापौर मीना आयलानी यांनी केला . तरीसुद्धा ही कारवाई सुरू राहणार असे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचे आदेश होते . गेल्या दीड महिन्यांपासून कल्याण – अंबरनाथ रस्त्यालगतच्या  अनधिकृत बांधकाम विरोधी तोडक कारवाई मनपाने गुंडाळली असल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात आरोप होऊ लागले आहेत .

उल्हासनगर शिवसेना प्रमुख व शिवसेना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी आरोप केला आहे की कल्याण – अंबरनाथ रस्त्यालगतची 7 अनधिकृत बांधकामे तोडण्याची यादी मनपाने तयार केली होती यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मागवला होता . मात्र 7 अनधिकृत बांधकामांपैकी 5 वर थातुरमातुर कारवाई करण्यात आली व उर्वरित 2 बांधकामांना मनपा प्रशासनाने हात देखील लावला नाही .  यामुळे या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता राजेंद्र चौधरी यांनी व्यक्त केली आहे . या प्रकरणाची लेखी तक्रार त्यांनी राज्याचे मुख्य सचिव तसेच नागरी विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे केली आहे . 

या संदर्भात मनपाचे विशेष कार्यकारी अधिकारी युवराज भदाणे यांना विचारले असता त्यांनी या संदर्भात पत्रकारांचा उर्मटपणे अपमान करुन या प्रकरणाचा उलघडा न करता थातुर मातूर उत्तरं देऊन ह्या प्रकरणावर पद्धशीरपणे पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे राजेंद्र चौधरी यांच्या आरोपामध्ये तथ्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Google Ad
Back to top button
Close
Close