नाशिक

आगामी लोकन्यायालयात निफाड तालुक्यातील सहकारी बॅंका व संस्थांनी वसुली वादपुर्व प्रकरणे दाखल करावी

आगामी लोकन्यायालयात निफाड तालुक्यातील सहकारी बॅंका व संस्थांनी वसुली वादपुर्व प्रकरणे दाखल करावी

 

लासलगाव(वार्ताहर) समीर पठाण :           निफाड येथील दि.14 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकन्यायालयात वसुली वादपुर्व प्रकरणांत बॅंका सेवा संस्था तसेच गृहनिर्माण संस्था यांनी सहभाग घेऊन प्रलंबीत थकबाकीची वसुली करावी असे आवाहन  निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.जी.मोहबे यांनी केले.

लासलगाव येथे रविवारी सकाळी जिल्हा सत्र न्यायाधीश ए.जी .मोहबे व निफाड येथील वरीष्ठ सत्र न्यायाधीश आर.आर.हस्तेकर यांनी राष्ट्रीय लोकन्यायालय पुर्व तयारी करीता निफाड वकील  संघाचे उपाध्यक्ष अॅड.बी.के.जंगम यांच्या समवेत पदाधिकारी यांनी विविध सहकारी बॅंकेचे प्रतिनिधी,सहकारी संस्था व गृहनिर्माण संस्थेचे प्रतिनिधी यांच्या विशेष बैठकीत मार्गदर्शन केले .
या प्रसंगी लोकनेते दत्ताजी पाटील बॅंकेचे चेअरमन  नानासाहेब पाटील,जि.प.सदस्य डी.के.जगताप लासलगाव मर्चंटस असोशिएनचे अध्यक्ष नंदकुमार डागा,लासलगावचे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्यासह प्रतिनिधी उपस्थितीत ही बैठक झाली.

राष्ट्रीय लोकन्यायालयांतर्गत निफाड जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या लोकन्यायालयात तीन कोटी दोन लाख पाच हजार रूपयांची नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने कर व बँकाची रक्कम भरत लोकन्यायालयाला अभुतपुर्व प्रतिसाद दिला आहे.तसाच प्रतिसाद याही न्यायालयात द्यावा असे आवाहन न्या. एस.जी.मोहबे यांनी केले.
निफाड न्यायालय‌ात विधी सेवा समीती तर्फे दिल्या जाणार्या  कायदेविषयक सुविधा याची माहीती देऊन निफाडचे वरीष्ठ  स्तर दिवाणी  न्यायाधीश आर आर हस्तेकर यांनी नगरपंचायत,तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत,विविध संस्था,पतसंस्था राष्ट्रीयकृत बँका यांचे वादपुर्व सदर प्रकरणांच्या नोटीसाहि संबंधितांना देण्यात येतील व त्यात वादपुर्व प्रकरणांत नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतील व या प्रकरणांत यशस्वी तडजोड झाली अनेक प्रकरणांत नागरिकांना लोकन्यायालयाचा फायदा होऊन व्याज व दंड माफ झाला त्याचे नागरिकांत समाधानाचे वातावरण दिसेल या मुळे सहभाग या लोकन्यायालयात घ्यावा असे आवाहन केले.
निफाड तालुक्यातील सर्व सहकारी  बॅंका तसेच सेवा सहकारी संस्था थकबाकी यांच्या करिता ही योजना लाभदायक आहे.त्या बाबत लवकरच जनजागृती  सभा घेण्यात यावी असे लोकनेते दत्ताजी पाटील  बॅंकेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी सांगितले.
लासलगाव मर्चंटस असोशिएनचे अध्यक्ष नंदकुमार डागा,लासलगाव मर्चंटस बॅंकेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी राजाराम रसाळ,लोकनेते दत्ताजी पाटील  बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कोल्हे,पगार चंद्रकांत वाळेकर,अनिल वाघ तसेच अॅड.उत्तम कदम, अॅड.नरेंद्र राणा,अँड.राजू जाधव,अँड.सुनील  उगलमुगले,अँड.शेखर देसाई यांनी चर्चेत सहभाग घेतला.याप्रसंगी अँड.सुभाष देशमुख,अँड.बी.एस. जाधव,अॅड.अभय जांगडा,अॅड.वाल्मीकराव गायकवाड,अँड अविनाश उगलमुगले,अॅड.के.के.शिंदे अॅड.विजय रायते,अँड.अजय काळे,अँड.विजया जगताप तसेच सुनील शिंदे,एस.एस.काद्री,शिवाजी जगताप,कोचर आदी उपस्थित  होते. 

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close