ठाणे

आयुक्तां मुळे स्थायी समिति सभापती,सदस्य अडचणीत !!!  जनेतेच्या पैशाचा चुराडा

आयुक्तां मुळे स्थायी समिति सभापती,सदस्य अडचणीत !!!  जनेतेच्या पैशाचा चुराडा

उल्हासनगर(गौतम वाघ):शहराचे शासकीय अधिकारी अर्थात लोक सेवक एट्रोसिटी प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. अश्या व्यक्तीला आर्थिक मदत करू नये असा सर्वोच्य(सुप्रिम कोर्टाचा) न्यायालयाचा आदेश आहे. या आदेशाला डावळून स्थायी समितिने सदर प्रकरणात आयुक्तां आर्थिक मदत करण्याचा ठराव एक मताने पास केल्याने ,स्थायी समिति सभापतीं सह मतदान करणारे सदस्य अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उल्हासनर महापालिकेला आय एस अधिकारी मिळावा ,म्हणून तत्कालीन सत्तेत असलेल्या सेनेने जंगजंग पछाडले. अखेर राजेन्द्र निबांळकर नावाचे आय ऐ एस(IAS) अधिकारी प्राप्त झाले.शहराचा सर्वांगीन विकास होणार असे स्वप्न उल्हासनगरातील सामान्य नागरिक पाहू लागला.मात्र 05 जुलै 2017रोजी आयुक्तांचा तोल गेला .आणि त्यांना माहित असूनही, नगरसेवक भगवान भालेराव यांना उद्देशुन “जातीवाचक” शब्द उचारला.त्या नंतर मोठा गदारोल निर्माण झाला.त्यानंतर आयुक्तां विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.
हुशार आयुक्तांनी नामी शक्कल लढवित आपण या प्रकरणात कसे निर्दोष आहोत. आणि सदरची केस लढण्या साठी पालिका प्रशासन आपल्याला कायद्या नुसार आर्थिक मदत करू शकते हे पटवून दिले. मनपा आयुक्तांच्या प्रस्तवा पुढे स्थायी समिति सभापती आणि सदस्य गार झाले.त्यांनी आयुक्तांवर भरवसा ठेऊन आर्थिक मंजूरिचा ठराव पास केला. वास्तविक पहाता सदर ठराव त्यांनी महा सभेत मांडणे गरजेचे होते.परिणामी याचा जो निकाल लागायचा तो लागला. जनतेच्या पैशाची अशी धुलधान करणाऱ्यां ,
सत्ताधा-या विरुद्ध असंतोषाचे वातावरण निर्माण झाले .आणि आयुक्ता विषयी अविश्वास निर्माण झाला आहे.
एखाद्या अश्या प्रकारे निधी उपलब्ध करून दयाचे असेल तर दोन्ही महासभेची परवानगी घेणे बंधनकारक असताना सुध्दा आयुक्तांना स्थायी समितीमध्ये प्रस्ताव आणून सदर निधी मंजूर करुन घेतला आहे. तर दुसरीकडे फिर्यादीला अश्या प्रकरणात शासन आर्थिक मदत करत असते तर दुसरी बाजु आरोपी असलेले आयुक्त राजेंद्र निबांळकर यानी स्थायी समिती आर्थिक मदतची तरतूद करुन जनतेच्या पेश्याचा चुराडा केला जाते आहे असे नगरसेवक भगवान भालेराव म्हणाले. स्थायी समितीने आयुक्त यांना दाव्याचा खटला लढवण्यासाठी निधीची तरतुद केली आहे त्यामुळे स्थायी समिती सदस्य वाद्याच्या भोवर्यात येण्याची शक्तता नाकारता येत नाही. या प्रकरणात स्थायी समितीने आयुक्त यांना खटला लढवण्यासाठी जे निधी उपलब्ध करून मदत केली आहे .त्या स्थायी सभापती सदस्यसह गुन्हा दाखल होऊ शकते. त्याचबरोबर या संदर्भात आम्ही शासन दरबारी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी करणार आहे. वेळ पडल्यास आम्ही न्यायालयात सुध्दा दाद मागणार आहे असे शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी म्हणाले.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close