नाशिक

इगतपुरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करा. – भा ज यु मो व शिवसंग्रामचे तहसिलदारांना निवेदन

इगतपुरी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानीचे पंचनामे करा. – भा ज यु मो व शिवसंग्रामचे तहसिलदारांना निवेदन.

नाशिक , ( रमेश पांडे ) : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच दडी मारली असून गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाने उघडीप केल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. पिकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी इगतपुरी तालुका भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष लालचंद पाटील व शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष अनिल गोवर्धने यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

तहसिलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन सादर करताना भाजयुमो चे तालुकाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसंग्रामचे अनिल गोवर्धने, चेतन जोशी, शुभम जाधव, सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे,आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते .

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close
Close