क्राइम

उल्हासनगरात झेरॉक्स नोटा चालवणारे दोघे अटकेत गुन्हे शाखेनं सापळा रचून केली कारवाई

उल्हासनगरात झेरॉक्स नोटा चालवणारे दोघे अटकेत
गुन्हे शाखेनं सापळा रचून केली कारवाई

उल्हासनगर (गौतम वाघ): चलनी नोटांची कलर झेरॉक्स काढून चालवण्याचा प्रयत्न करणा-या दोघांना उल्हासनगरात पकडण्यात आलंय. त्यांच्याकडून ५००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटांच्या कलर झेरॉक्स जप्त करण्यात आल्या आहेत.

विनोद प्रकाश शहा आणि अरुण गुरव अशी या दोघांची नावं असून ते दोघेही पनवेलचे राहणारे आहेत. ते उल्हासनगरच्या ऍम्ब्रोशिया हॉटेल परिसरात खोट्या नोटा चालवण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती, त्यानुसार सापळा रचून या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून एकूण २१ हजार ५५० रुपये इतक्या किंमतीच्या नोटांच्या कलर झेरॉक्स पोलिसांनी जप्त केल्या असून न्यायालयानं त्यांना १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीये पुढिल तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल हे करत आहेत.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close