Breaking News

उल्हासनगर मधील झोपडपट्ट्या रिंगरुट मुळे होणार उध्वस्त .शिवसेना व आर.पी.आय. चा रिंगरुटला विरोध .

उल्हासनगर मधील झोपडपट्ट्या रिंगरुट मुळे होणार उध्वस्त .शिवसेना व आर.पी.आय. चा रिंगरुटला विरोध .

उल्हासनगर(गौतम वाघ):– अखेर महाराष्ट्र शासनाने उल्हासनगर शहराच्या विकास आराखड्याला मंजुरी देऊन उल्हासनगर महानगरपालिकेत प्रसिद्धीसाठी पाठवला आहे, सदर विकास आराखड्या मध्ये म्हारळ नाका ते फकडमंडली मार्गे आझाद नगर, पंजाबी कॉलनी, सुभाषनगर पासुन आनंद नगर ,संम्राट अशोकनगर ,वडोल गांव , भरतनगर मार्ग,कैलास काँलनी गायकवाड पाडा, नेताजी चौक, व्हिनस चौक,मोर्या नगरी,श्री राम पेट्रोलपंप,विठ्ठलवाडी,शांती नगर असा रिंगरुट काढण्यात येत असल्याने हजारो झोपड्पट्टीधारक बेघर होऊ शकतात. त्यासाठी १२० फुटा ऐवजी ८० फुटाचा रिंगरुट करावा अन्यथा शिवसेना , रिपाई रस्त्यावर उतरुन कडाडुन विरोध करणार आहे अशी मांगणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आर पी आय चे भगवान भालेराव आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी केली आहे . राज्य सरकारने हा आराखडा मंजूर केला असुन ४ डिसेंबरला हा आराखडा उल्हासनगर महापालिका प्रसिध्द करणार आहे. सदर आराखडा प्रसिद्ध झाल्यापासून ३०दिवस त्यावर पुन्हा हरकती मागवल्या जाणार आहेत. ह्या आराखड्यात १२०फुटाचा रिंगरुट झाला तर तर हजारो झोपडपट्यातील कुटुंबं उध्वस्त होणार आहेत.तर गेल्या ५० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबाना आपले घर गमवावे लागेल म्हणून सदर रस्ता १२० ऐवजी ८० फुट करावा अशी मागणी सदर नेत्यांनी केली आहे.तर ह्याउल्हासनगर मधील झोपडपट्ट्या रिंगरुट मुळे होणार उध्वस्त .शिवसेना व आर.पी.आय. चा रिंगरुटला विरोध . रिंगरुट मध्ये बाधीत गरिब नागरिकांची घरे वाचविण्यासाठी वेळ पडल्यास आंदोलन सुद्धा करु असे शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक श्री राजेंद्र चौधरी,रिपाईचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक भगवान भालेराव यांनी सांगितले आहे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close