Breaking News

कडोंमपात शिवसेनेला झटका, महापौरांचं नगरसेवक पद रद्द

कडोंमपात शिवसेनेला झटका, महापौरांचं नगरसेवक पद रद्द 

 

कल्याण(गौतम वाघ) : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार अर्जुन म्हाञे यांनी देवळेकर यांची जात पडताळणी प्रमाणपञ यापुर्वीच रद्द झाल्याचे कारण देत कल्याण न्यायालयात याचीका दाखल केली होती. या याचीकेवर आज कल्याण न्यायालयात सुनावणी झाली. त्यामुळे कल्याण- डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. निवडणूक अर्जासोबत दोन जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यामुळे त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवळेकर यांच्यासह शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. यात देवळेकर आणि सेनेच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणजे या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना एक महिन्याची मुदतही देण्यात आली आहे.

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close