शैक्षणिक

कृतिका सुहास झांबरे ची युरोपमधील नेदरलँड या शहरांमध्ये उन्हाळी विज्ञान प्रशिक्षण वर्गासाठी निवड

कृतिका सुहास झांबरे ची युरोपमधील नेदरलँड या शहरांमध्ये उन्हाळी विज्ञान प्रशिक्षण वर्गासाठी निवड

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण :               लासलगाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै.चंदूलाल झांबरे यांची नात कृतिका सुहास झांबरे ची युरोपमधील नेदरलँड या शहरांमध्ये उन्हाळी  विज्ञान प्रशिक्षण वर्गासाठी निवड झाली आहे. सदरचे प्रशिक्षण २५ मे २०१८ ते १० जुन २०१८ या कालावधीमध्ये असून युरोप आणि भारत सरकार दरवर्षी होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी विद्यार्थ्यांना संधी देत असतात

कृतिका ने सन २०१५ मध्ये अमेरिकेच्या ड्यूक विद्यापीठामध्ये प्रशिक्षण घेतले होते. कृतिका मुंबई जुहू मधील जमनाबाई नरसी या विद्यालायात ११  विज्ञान या शाखेच्या वर्गात शिक्षण घेत असून मुंबईतील नेहरू विज्ञान सेंटरमध्ये युवा शास्त्रज्ञ म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शनाखाली किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. भारतरत्न डॉ अब्दुल कलाम हे कृतिका चे आदर्श असून भविष्यात शास्त्रज्ञ बनून देशसेवा करणे हे आहे.या यशाबद्दल समाजातील सर्वाकडून कृतिका अभिनंदन होत आहे .

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close