ठाणे

के 3 संघटनेच्या पदाधिकारी यांनी उल्हासनगर रेल्वे स्थानकाची केली पाहणी

के 3 संघटनेच्या पदाधिकारी यांनी उल्हासनगर रेल्वे स्थानकाची केली पाहणी

उल्हासनगर( श्यामभाऊ जांबोलीकर ) : आज कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत उल्हासनगर स्थानकातील रेल्वे प्रवासी बांधवांना भेडसाविणार्या समस्यांची पाहणी करण्यात आली .या स्थानकात पहिल्यांदा सर्व समस्यांची पाहणी करण्यात आली
.यात प्रामुख्याने फलाट क्र२ वरील शौच्छालयाची दुरावस्था ,स्थानकात अपंग बांधवांकरिता होणारी हेळसांड यात आरक्षण तिकिटघर येथे स्वतंञ खिडकी वा रांग लावली जात नाही व त्यांना सर्वसाधारण प्रवाशांसोबत ताटकळत तासनतास उभे केले जातेय याशिवाय फलाटांवर त्यांच्याकरिता आसनव्यवस्था आरक्षित असूनही त्यांच्या जागी धडधाकट प्रवासी त्यांच्या आसनावर बसून त्यांना उभे राहावे लागते ,स्थानक परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे साम्राज्य आहे .फलाटांवर कचराकुंडी तुडूंब भरलेल्या असून ती परिस्थिती पाहता किमान महिनाभर त्याकडे स्थानकातील स्वच्छता कर्मचार्याने ढुंकुणही बघितलेले नसावे व एकंदरीत शौच्छालय ,स्थानक परिसर व फलाटांवरील ठिकठिकाणी असलेली घाण कचरा पाहता स्वच्छ रेल , स्वच्छ भारत याचा पुर्ण फज्जा उडालेला आहे .स्थानकात फलाटावरील एस्केलेटर सध्या सुरू होती माञ प्रवासी तक्रार करीत होते कि याच्या मेंटेनेन्सवर लक्ष दिले जात नाही .फलाट २ वरील इंडीकेटर्स पावसाळ्या पासून तांञिक बिघाडाने बंद दिसले . स्थानक परिसरात फलाट २ वर कोणतीही संरक्षक भिंत नसल्याने अतिक्रमण फलाटापर्यंत आल्याचे दिसले .वाटर व्हेंडिंग मशीन नव्यानेच बसविण्यात आलेय तीही बंद अवस्थेत आढळली .सध्या फलाट क्२ वरील शौच्छालय नुतनीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून तात्पुरती अपंगाकरिताचे शौच्छालय वापरण्यास खुले केले माञ त्यात अस्वच्छतेमुळे इतकी घाण आहे कि कोणीही ते वापरण्यास धजावणार नाही रुग्णवाहिके साठी जागा उपलब्ध केली असून रुग्णवाहिकेचा मात्र पता नाही त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात गैरसोय किंबहुना त्यांना रस्त्यात जीव सोडावा लागत आहे या गोष्टीचे काहीही सोयरसुतक स्थानिक अधिकार्यांना वाटतेय हे चर्चेत दिसले नाही . उल्हासनगर हे स्थानक वर्दळीचे व काही वर्षापुर्वी येथील लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे . स्टेशन प्रभारी यांच्याशी या समस्यांवर चर्चा केली असता या स्थानकातील दैनंदिन प्रवासी संख्येचा ताण पाहता सध्याचे मनुष्यबळ अपुरे असल्याचे जाणवले. या स्थानकात महिन्याला किमान २० लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करतात व महिन्याला मासिक उत्पन्न सव्वा कोटीच्या घरात असून माञ रेल्वे वरिष्ठ पातळीवर या स्थानकाबाबत पुर्णतः दुर्लक्ष दिसतेय .या स्थानकात सद्यस्थितीला ४ स्वच्छता कर्मचारी ,२ जिआरपी पोलिस ,४ आरपीएफ पोलिस नोंदीप्रमाणे आहेत माञ प्रत्यक्षात याचा वावर दिसत नाही .आजही सकाळी केवळ एक स्वच्छता कर्मचारी ,एक आरपीएफ गणवेशात फलाटावर आढळला .आरपीएफ पोलिस यांच्याशी भेटून स्थानकातील सुरक्षिततेबाबत चर्चा केली .गेल्या काही दिवसात स्काय वाक वर गुन्हेगारी व चोरीचे प्रमाण वाढले आहे त्यावर रेल्वेची हद्दीत नसल्याने रेल्वे पोलिस यांनी हात झटकले असून राज्य पोलिस व मनपाकडे ऊंगलीनिर्देशन करतायेत. या स्थानकपरिसरातील अतिक्रमण व वाहतुक कोंडी समस्या यावर मनपा व राज्य सरकार यांना काहीही देणेघेणे नाही अशी परिस्थिती दिसतेय .स्थानकातील सर्व या समस्या ज्या रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारित आहेत त्या रेल्वे मुंबई विभागिय व्यवस्थापक मध्य रेल्वेचे एस.के.जैन व वाणिज्य विभागिय व्यवस्थापक नरेंद्र पनवार यांना पाठविल्या असून त्या सोडविण्याकरिता रेल्वे वरिष्ठ पातळीवर संघटनेतर्फे पाठपुरावा करण्यात येईल .या स्थानकाच्या पाहणी मध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष भरत खरे ,सरचिटणीस श्याम उबाळे व उल्हासनगर स्थानक प्रतिनिधी उपस्थितीत होते .

Google Ad

Related Articles

Back to top button
Close
Close